नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये पॅथोलॉजी दलालांचा सुळसुळाट, भूलथापा देत सामान्य माणसाची होतेय लूट
रुग्णांचे नातेवाईक आपल्या रुग्णाप्रती भावनिक असतात. अशा नातेवाईकांना हे दलाल भूलथापा देत त्यांना बाहेरून टेस्ट करण्यास सांगतात. येथे योग्य चाचण्या होत नाहीत, उशीर लागतो त्यामुळे उपचारात उशीर होईल असं सांगून त्यांना घेऊन जातात
नागपूर : नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये खाजगी पेथॉलॉजीच्या दलालांचा बोलबाला सुरु आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना भूलथापा देत बाहेरून चाचण्या करण्यास परावृत्त करत असल्याचं उघडकीस आलं आहे. मेडिकल प्रशासनाने आतापर्यंत 8 ते 10 दलालांना पोलिसांच्या हवाली केलं आहे. मात्र यामुळे सामान्य रुग्णांची लूट होत आहे. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आणि त्याचा वापर सामान्य जनतेसाठी होतो. मात्र अशा प्रकारचे दलाल सामान्य माणसाची लूट करण्यासाठी असे काम करतात यावर कठोर कारवाईची गरज आहे. (Pathology brokers in Nagpur Medical College, 8 to 10 brokers have been arrested)
भूलथापा देत रुग्णांना बाहेरुन चाचण्या करण्यास प्रवृत्त करतात
नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे नागपूर आणि विदर्भच नाही तर मध्य प्रदेश, छत्तीसगडला आरोग्य सेवा देणारे केंद्र. या ठिकाणी लहानात लहानापासून ते मोठ्या आजारापर्यंत उपचार केले जातात. हे मेडिकल गरिबांसाठी जीवनदायी ठरते. या ठिकाणी अत्यावश्यकसर्व चाचण्या सुद्धा होतात. मात्र काही खाजगी पेथॉलॉजी लॅबोरटीने आपले दलाल पोसले असून हे दलाल या ठिकाणी घुसखोरी करत रुग्णांना बाहेर तपासण्या करण्यास प्रवृत्त करतात. रुग्णांचे नातेवाईक आपल्या रुग्णाप्रती भावनिक असतात. अशा नातेवाईकांना हे दलाल भूलथापा देत त्यांना बाहेरून टेस्ट करण्यास सांगतात. येथे योग्य चाचण्या होत नाहीत, उशीर लागतो त्यामुळे उपचारात उशीर होईल असं सांगून त्यांना घेऊन जातात. अशा दलालांवर आता मेडिकल प्रशासनाने लक्ष केंद्रित केलं असून आतापर्यंत 8 ते 10 दलालांना ताब्यात घेतले आहे.
सांगलीत बोगस कागदपत्रांद्वारे लोकसेवा आयोगाच्या फसवणुकीचा प्रयत्न
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहाय्यक कर निरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी बोगस कागदपत्रे तयार करुन आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी सांगलीच्या एलसीबी पथकाने दोघांना अटक केली आहे. भास्कर माधव तास्के (वय 35 राहणार वाकोली तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली), इंद्रजीत बाळासाहेब माने (वय 29 राहणार भादूरवाडी जिल्हा सांगली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फसवणुकीचा प्रकार सहा वर्षांपूर्वी घडला होता. माने यांनी बोगस कागदपत्रे तयार करुन लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या वेळी भास्कर तास्के यांना मदत केली होती. या परीक्षेत तास्के राज्यात दुसरा आला होता. त्याची लातूर येथे सहाय्यक कर निरीक्षक पदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर इंद्रजीत हा सुद्धा सहाय्यक कर निरीक्षक पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्यांची नियुक्ती मुंबई येथे झाली होती. आयोगाला परीक्षेतील बोगस कागदपत्राची माहिती मिळाली. दिनांक 1 एप्रिल 2019 रोजी आयोगाचे उपसचिव सुनील अवताडे यांनी माने, तास्के दोघांविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. (Pathology brokers in Nagpur Medical College, 8 to 10 brokers have been arrested)
Aryan Khan Bail | मोठी बातमी ! आर्यन खानच्या जामीनावरची आजची सुनावणी स्थगित, उद्या पुन्हा युक्तीवाद होणारhttps://t.co/1dp2wrzTMO#AryanKhanCase | #AryanKhanDrugsCase | #AryanKhanArrested
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 26, 2021
इतर बातम्या
धक्कादायक! मध्य प्रदेशात पत्नीने खायला सांगितले म्हणून पतीने तिचे नाक कापले