नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ईडीकडून तीन दिवस सलग चौकशी झाली आणि इकडे राज्यात काँग्रेस (Congress) रस्त्यावर उतरली. यावेळी मोदी सरकार आणि ईडीवर काँग्रेस नेत्यांनी हल्लाबोल चढवला. मात्र यावेळी बोलताना एका काँग्रेस कार्यकर्त्याची जीभ घसरली. ‘कुत्ते की मौत मरेगा’ म्हणत त्यांनी भर सभेतून मोदींवर (PM Modi) टीका केली. त्यानतंर काल नागपूर पोलिसांनी त्याला अटक केली, मात्र काही वेळात जामीनही झाला. मात्र हेच प्रकरण आता पुन्हा तापतंय. कारण भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावरूनच आता सरकारला थेट तीन दिवसांचा अल्टिमेटम देऊन टाकलाय. शेख हुसैन यांना अटक करण्याची भाजपची मागणी आता जोर धरु लागलीय. कैतकी चितळे यांच्यावर कारवाई होते, मग शेख हुसैन यांच्यावर का नाही? असा सवाल आता भाजप नेत्यांनी केला आहे.
In a protest outside ED office in Nagpur, Congress leader and Former City President Sheikh Hussain threatened PM Modi by saying – “Narendra Modi will die a dog’s death”.
Congress Ministers Nitin Rane and Vijay Wadettiwar were also present at the protest.https://t.co/mcHRgKS6HY pic.twitter.com/AEvWUXJKLw
— Maha Vinash Aghadi ᴾᵃʳᵒᵈʸ (@MVAGovt) June 15, 2022
तसेच त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांना तीन दिवस वेळ देऊ, शेख हुसैन यांना अटक झाली नाही तर न्यायालयात जाणार, असा इशाही बावनकुळे यांनी दिला आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत ‘थप्पड’ शब्द वापरला तेव्हा त्यांना अटक केली. मग शेख हुसैन यांनी पंतप्रधान यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अटकेची कारवाई का नाही? असाही सवाल आता भाजप नेते उपस्थित कर आहेत. तसेच नागपूर पोलीस दबावात आहे का? ‘त्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल करा’ अशी मागणी भाजप नेत्यांनी उचलून धरली आहे. यात ‘मंत्री नितीन राऊत, मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजीत वंजारी, राजेंद्र मुळक यांनी पंतप्रधान यांच्याबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करा’ असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे.
नागपुरात ईडी विरोधात झालेल्या झालेल्या आंदोलनात बोलताना शेख हुसैन यांनी हे वक्तव्य केलं होतं. बावनकुळे यांच्यासोबत आ. कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख आणि इतर भाजप पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावर बोलताना नागपूर पोलीस आयुक्त म्हणाले, घडलेल्या घटनेनंतर आम्ही लगेच गुन्हा दाखल केला. हा गुन्हा बेलेबल असल्याने जमीन झाला. आता भाजपच्या निवेदनानंतर आणखी काय कलम लावता येईल, याबाबत कायदेशीर कारवाई करु, तसेच शेख हुसैन यांच्याबाबत ताज बाबा ट्रस्ट मधील काही गैरव्यवहाराची तक्रार आली होती. त्याबाबतही माहिती घेऊ, या प्रकरणात पोलिसांवर कुणाचाही दबाव नाही, आम्ही कायद्यानुसार कारवाई करतोय, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्तांनी दिली आहे.