देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांची नोटीस, अनिल बोंडे यांनी सांगितले यामागील कारण, आता जेलमध्ये जाण्यासाठी कुणाचा नंबर?

या सर्व प्रकरणांमुळं देवेंद्र फडणवीस यांचे तोंड कसे बंद करता येईल, यासाठी ही नोटीस पाठविली असल्याचं अनिल बोंडे यांनी नागपुरात सांगितलं. फडणवीस यांच्यावर एक तरी आरोप खरा करून दाखवा. ज्यांनी भ्रष्टाचार केला ते राज्यात अराजक माजविण्याचं काम तीनही पक्ष करत आहेत, असा आरोप अनिल बोंडे यांनी केलाय.

देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांची नोटीस, अनिल बोंडे यांनी सांगितले यामागील कारण, आता जेलमध्ये जाण्यासाठी कुणाचा नंबर?
आमदार अनिल बोंडेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 10:47 AM

नागपूर : सरकारमधील पोलिसांच्या बदल्यांची गोपनीय माहिती उघड (Disclosure of confidential information) करण्यात आली. या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. याप्रकरणी फडणवीस म्हणाले, बदल घोटाळा प्रकरण गेल्या सहा महिन्यांपासून धूळखात पडला आहे. त्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे. परंतु, उलट घोटाळा उघड करणाऱ्यांचीच चौकशी करत आहेत. फडणवीस यांनी स्पष्ट केली की, माझ्या माहितीचा स्त्रोत सांगणे मला बंधनकारक नाही. ऑफिशियल सिक्रेट अॅक्टनुसार राज्य सरकारनं गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सरकारी वकिलांचे बिंग फोडणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. यावर प्रतिक्रिया देताना आमदार डॉ. अनिल बोंडे ( MLA Dr. Anil Bonde) म्हणतात, एकटे देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर भारी पडले आहेत. फडणवीस आणखी रेकॉर्डिंग समोर आणतील, या भीतीमुळं बहुतेक मंत्री धास्तावले आहेत.

भ्रष्टाचार करणारे अराजक माजवितात

अनिल बोंडे म्हणाले, विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं काम केलं. त्यांनी बदलीसंदर्भात सर्व माहिती बाहेर काढली. मनसुख हिरेन यांचे हत्या प्रकरणी महत्त्वाची माहितीही फडणवीस यांनी बाहेर काढली. यामुळं राज्य सरकारमधील काही मंत्र्यांची टरकली आहे. या सर्व प्रकरणांमुळं देवेंद्र फडणवीस यांचे तोंड कसे बंद करता येईल, यासाठी ही नोटीस पाठविली असल्याचं अनिल बोंडे यांनी नागपुरात सांगितलं. फडणवीस यांच्यावर एक तरी आरोप खरा करून दाखवा. ज्यांनी भ्रष्टाचार केला ते राज्यात अराजक माजविण्याचं काम तीनही पक्ष करत आहेत, असा आरोप अनिल बोंडे यांनी केलाय.

आता कुणाचा नंबर

गैरव्यवहार करणाऱ्यांना सळो की पळो करून फडणीवस यांनी सोडले आहे. त्यामुळं फडणवीस यांना ही नोटीस पाठविण्यात आली आहे. या घटनेचा विरोध करण्यासाठी आम्ही आम्ही एसपी ऑफिसमध्ये काळे फित लावून विरोध करणार आहोत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख कैदेत आहेत. नबाब मलिकही जेलमध्ये पाहुणचार खात आहेत. आता अनिल परब यांना नंबर लवकरच येऊ शकतो. टरबुजा हुआ लाल अब सब सडेंगे सालोसाल, असं म्हणून त्यांनी सरकारवरील भ्रष्ट मंत्र्यांवर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे बहुतेक सर्व नेते भ्रष्टाचाराने माखले आहेत. ते सर्व आता जेलमध्ये जाणार. त्यांची चंपी होणार, असंही भाकित अनिल बोंडे यांनी वर्तविले.

नागपुरात रंगली अनोखी मॅरेथॉन, हजारो मायलेकी धावल्या, माहिला जगताचा लोकजागर

गोंदिया ते हैदराबाद विमानसेवा आजपासून सुरू, श्रेय कुणाचे प्रफुल्ल पटेल की सुनील मेंढे यांचे?

हरविलेला कुत्रा शोधा नि 50 हजार रुपये कमवा! एकीकडं श्वानप्रेम, तर दुसरीकडं तिरस्कार का?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.