नितीन देशमुख म्हणतात, माझ्या जीवाला धोका; ठाकरे गट विरुद्ध भाजप यातील संघर्ष?
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना आज नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं. अकोला जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याच्या प्रश्नासाठी त्यांनी नागपूरपर्यंत संघर्ष यात्रा काढली.
नागपूर : अकोल्यात नितीन देशमुख यांना आणण्यात आलेल्या पोलिसाच्या गाडीला कार्यकर्त्यांनी अडविले. देशमुखांना पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर केल्यानंतर त्यांना थोड्या वेळानं सोडून देण्यात आलं. दरम्यान, आमदार नितीन देशमुख यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं स्पष्टच म्हणाले. एका आयपीएस अधिकाऱ्यांनी नाव न सांगता ही माहिती दिली. आपण सावध राहावे असाही सल्ला त्या आयपीएस अधिकाऱ्यानं दिला आहे. अशी खुद्द माहिती देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलताना दिली आहे.
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना आज नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं. अकोला जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याच्या प्रश्नासाठी त्यांनी नागपूरपर्यंत संघर्ष यात्रा काढली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर जाण्यासाठी निघालेल्या यात्रेला नागपूर पोलिसांनी परवानगी नाकारली. पोलिसांनी ही संघर्ष यात्रा नागपूरच्या वेशीवरचं अडवली. नितीन देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं.
नितीन देशमुख यांना अकोल्यात सोडलं
अकोला जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याच्या प्रश्नावर निघालेली संघर्ष यात्रा काल नागपूरच्या वेशीवर आली. आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर ही संघर्ष जाणार होती. पण पोलिसांनी रात्री परवानगी नाकारली. आज सकाळी नितीन देशमुख यांना ताब्यात घेतलं आणि अकोल्याचे नेऊन सोडलं.
पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त
नितीन देशमुख यांच्या संघर्ष यात्रेचा काल वडधामना येथे मुक्काम होता. आज सकाळी ही यात्रा फडणवीस यांच्या घराच्या दिशेनं निघणार होती. पण नागपूर पोलिसांनी प्रचंड मोठा बंदोबस्त लावला आणि त्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं.
पाणीपुरवठा योजनेला स्थगिती
अकोला जिल्ह्यातील बाळापूर खारपान पट्यातील गावांसाठी 69 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला सरकारने स्थगिती दिलीय. ठाकरे गटाचे नितीन देशमुख यांनी संघर्ष सुरु केला. सुरुवातीला अधिवेशनात हा मुद्दा मांडला. त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष यात्रेला सुरुवात झाली.
अकोल्यावरुन शांततेत निघालेल्या या संघर्ष यात्रेला नागपूरच्या वेशीवर थांबवण्यात आलंय. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पण हा संघर्ष थांबणार नाही, असं नितीन देशमुख यांनी सांगितलं.
नितीन देशमुख यांनी पाण्याच्या मुद्द्यावर संघर्ष यात्रा काढली. पण हा मुद्दा फक्त पाण्यापुरता नाही. हा संघर्ष आहे ठाकरे गट विरुद्ध भाजप यांच्यातला. याची सुरुवात झालीय. भविष्यात हा संघर्ष आणखी वाढणार असं चित्र सध्यातरी दिसतेय.