Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pooja Chavhan case : पुणे पोलिसांचे पथक यवतमाळमध्ये दाखल, रुग्णालयातील उपचाराबाबत तपास होणार

वानवडी पोलिसांचं एक पथक सोमवारी यवतमाळमध्ये दाखल झालं आहे. पूजा चव्हाण हिने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती मिळतेय. त्याबाबत तपास करण्यासाठी हे पथक यवतमाळमध्ये पोहोचलं आहे.

Pooja Chavhan case : पुणे पोलिसांचे पथक यवतमाळमध्ये दाखल, रुग्णालयातील उपचाराबाबत तपास होणार
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 8:55 PM

यवतमाळ : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आता पुणे पोलिसांनी तपास मोहीम हाती घेतली आहे. पोलीस महासंचालकांनी पुणे पोलीस आयुक्तांना तपासाचे आदेश दिल्यानंतर पोलीसांकडून मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. वानवडी पोलिसांचं एक पथक सोमवारी यवतमाळमध्ये दाखल झालं आहे. पूजा चव्हाण हिने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती मिळतेय. त्याबाबत तपास करण्यासाठी हे पथक यवतमाळमध्ये पोहोचलं आहे.(Pune Police reached Yavatmal District Hospital to investigate the Pooja Chavan case)

पूजा चव्हाण हिने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेतले होते का? याबाबत पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्याच्या वानवडी पोलीस ठाण्याचं एक पथक यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालं आहे. पुणे पोलिसांनी तशी नोंद यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात केली आहे. या तपासाबाबत पुणे पोलिसांनी रुग्णालय अधिष्ठातांना एक पत्रही लिहिलं आहे. त्यात पूजा चव्हाण हिने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेतले होते का? उपचार घेतले असतील तर ते कुठल्या प्रकारचे उपचार होते? असे काही प्रश्न या पत्राद्वारे विचारण्यात आले आहेत. इतकच नाही तर पूजा चव्हाण हिने अजून कुठे उपचार घेतले होते का? याचाही तपास पुणे पोलीस करत आहेत.

रुग्णालयात पूजा अरुण राठोड अशी नोंद!

यवतमाळ जिल्हा रुग्णालयात 2 फेब्रुवारीला पूजा चव्हाण नाही तर पूजा अरुण राठोड या नावाने एका रुग्णाची नोंद असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळत आहे. त्यामुळे पूजा हिने नाव बदलून उपचार का घेतले? असा सवाल विचारला जात आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग विभागाचे प्रमुख नॉट रिचेबल असल्यानं या प्रकरणाचं गूढ अधिक वाढत आहे.

‘संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी होणार’

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर ८ दिवसांनी आपलं मौन सोडलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणी विरोधक करत असलेला आरोप चुकीचा आहे. वन मंत्री संजय कराठोड यांची नियमानुसार चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांवर कोणताही दबाव नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत. पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. चौकशी अहवाल आल्यावर सत्य निष्पन्न होईल, असं देशमुख यांनी सांगितलं.

काय आहे आत्महत्या प्रकरण?

पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले. दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं. राठोड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी पुढं आली. तेव्हापासूनच संजय राठोड नॉटरिचेबल आहेत.

संबंधित बातम्या :

कोण आहे अरुण राठोड? जो सातत्यानं पूजा आणि मंत्र्यांच्या संपर्कात होता?

संजय राठोड यांची हकालपट्टी करा, पूजा चव्हाण प्रकरणावरुन अतुल भातखळकर आक्रमक

Pune Police reached Yavatmal District Hospital to investigate the Pooja Chavan case

.. अन् सुनील तटकरे मंत्रालयाकडे पायीच निघाले
.. अन् सुनील तटकरे मंत्रालयाकडे पायीच निघाले.
'भैय्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचं की नाही...’, मनसे नेत्याचा इशारा
'भैय्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचं की नाही...’, मनसे नेत्याचा इशारा.
अहमदाबादमध्ये कॉंग्रेस कार्यकर्णीच्या बैठकीला सुरुवात
अहमदाबादमध्ये कॉंग्रेस कार्यकर्णीच्या बैठकीला सुरुवात.
निव्वळ दादागिरी, सर्व अटी भंग अन्..., गंभीर आरोप करत धंगेकरांची मागणी
निव्वळ दादागिरी, सर्व अटी भंग अन्..., गंभीर आरोप करत धंगेकरांची मागणी.
अकोला ठरलं राज्यातलं हॉट सिटी; उष्णतेची उचांकी नोंद
अकोला ठरलं राज्यातलं हॉट सिटी; उष्णतेची उचांकी नोंद.
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?.
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी.
लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज
लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज.
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?.
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?.