नागपूर : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळविण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojana) 2019 पासून सुरू केलेली आहे. नागपूर जिल्ह्यात 25 मार्च रोजी लाभार्थ्यांच्या नोंदणीतील त्रुटींची दुरुस्ती करण्यासाठी गाव पातळीवर शिबीर होणार आहे. पात्र शेतकऱ्यांची त्रुटी पूर्तता व्हावी, यासाठी ही शिबिर होणार आहेत. यासाठी स्वत:चे बँक पासबुक किंवा चेक बुक, आधार कार्ड, जमिनीचा सातबारा व 8-अ चा उतारा आदी कागदपत्रे गावासाठी नियुक्त अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडे द्यावीत. असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला (Collector R. Vimala) यांनी केले आहे. या योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (eligible farmer family) दोन हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन हजार असे सहा हजार रुपयांचा लाभ प्रती वर्षी दिला जात आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत योजनेच्या पोर्टलवर एकूण 2 लाख 10 हजार लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परंतु काही लाभार्थी ट्रान्झाक्शन फेल्युअर, आधार कार्ड दुरुस्ती, पीएफएमएसने नाकारणे आदी कारणांनी लाभापासून वंचित आहेत. या लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी 25 मार्च रोजी होणाऱ्या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा 2022 अंतर्गत प्रश्न मंजुषा, व्हिडीओ तयार करण्याची स्पर्धा, पोस्टर डिजाईन, गाण्याची स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धा अशा पाच प्रकारच्या स्पर्धा 15 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी स्पर्धकांचा उत्साह बघता भारत निवडणूक आयोगाने सर्व स्पर्धांना 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या स्पर्धमध्ये स्पर्धकांनी सहभागी होण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाने https://ecisveep.nic.in/contest/ या वेबलिंकवर जावून सहभागी व्हावे. तसेच क्युआर कोडवर मोबाईलद्वारे स्कॅन करूनदेखील स्पर्धकांना स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल.
BJP नेते रस्त्यावर कटोरा घेऊन भीक मागत आहेत का?; संजय राऊतांचा सवाल