Prakash Ambedkar : …तर ॲट्रॉसिटी दाखल होऊ शकतो, प्रकाश आंबेडकरांचा इशारा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना काय इशारा?

Prakash Ambedkar on Atrocity : वंचित नेत प्रकाश आंबेडकर यांच्या एका विधानाने सध्या राज्याचे लक्ष वेधले आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा सल्ला दिला आहे. त्यांनी राजकारणात स्वतःला अडचणीत आणू नका, असा सल्ला राज्यातील या दोन मोठ्या नेत्यांना दिला आहे.

Prakash Ambedkar : ...तर ॲट्रॉसिटी दाखल होऊ शकतो, प्रकाश आंबेडकरांचा इशारा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना काय इशारा?
आंबेडकरांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना मोठा सल्ला
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 12:18 PM

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या एका वक्तव्याने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. राज्यात सध्या आरक्षण बचाव आणि आरक्षण द्या यावरून धूमश्चक्री उडली आहे. राजकारण तापले आहे. आहे रे आणि नाही रे मधील हा संघर्ष दिवसागणिक तीव्र होत आहे. अर्थात त्याला विधानसभा निवडणुकीची किनार आहे, हे न ओळखणारे मतदार दूध खुळे नाहीत. या घडामोडीतच प्रकाश आंबेडकर यांनी मोठा बॉम्ब टाकला आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा सल्ला दिला आहे. त्यांनी राजकारणात स्वतःला अडचणीत आणू नका, असा सल्ला राज्यातील या दोन मोठ्या नेत्यांना दिला आहे.

मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणावरून गोंधळ

सध्या राज्यात मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणावरून एकच गोंधळ उडाला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात आरक्षणासाठी पुन्हा हुंकार देण्यात आला. गेल्या सहा ते आठ वर्षात मराठा समाजाने आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे काढले आहेत. यावेळी महायुती सरकारने त्यांच्या अनेक मागण्यांवर सकारात्मक पाऊल टाकले आहे. तर सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी यावरून गदारोळ सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

दुसरीकडे ओबीसींचे काही नेते मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये यासाठी आंदोलन करत आहे. त्यासाठी त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी आणि वडीगोद्री येथे उपोषण सुद्धा केले. त्यापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधाची मशाल पेटवली. त्यांनी ओबीसी आरक्षण बचाव सभा घेतल्या. तर गेल्या काही वर्षांपासून धनगर समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत आहे. धनगर आणि धनगड या शब्दावरून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला असला तरी धनगर समाज अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणासाठी आग्रही आहे. त्यासाठी पंढरपूर येथे उपोषण करण्यात आले. या सर्व गदारोळात आता प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मोठा सल्ला दिला आहे.

कायद्याच्या चौकटीत अडकू नका

धनगर आरक्षण अहवालाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्वतःला कायद्याच्या चौकटीत अडकून घेऊ नये. मताच्या राजकारणामुळे तुम्ही स्वतःला अडचणीत आणू नका, अट्रोसिटी दाखल होऊ शकतो.. कायद्याप्रमाणे त्यांनी वागावे, असा मोलाचा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

शहाजी बापू्ंनी केले वक्तव्य तर सुहास बापूच आमदार......
शहाजी बापू्ंनी केले वक्तव्य तर सुहास बापूच आमदार.......
विरोधकांना धारेवर धरणारे अमोल मिटकरी बनले ट्राफिक पोलीस, बघा व्हिडीओ
विरोधकांना धारेवर धरणारे अमोल मिटकरी बनले ट्राफिक पोलीस, बघा व्हिडीओ.
दादा कार्यकर्त्यांवर भडकले, 'फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी...'
दादा कार्यकर्त्यांवर भडकले, 'फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी...'.
नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन
नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन.
सुळेंचा भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'
सुळेंचा भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'.
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण...
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण....
'हम-हम पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा
'हम-हम पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा.
अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा
अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा.
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा.
'लक्ष्मण हाके डान्सबारमध्ये दारू पितात, आमच्याकडे व्हिडीओ अन्...'
'लक्ष्मण हाके डान्सबारमध्ये दारू पितात, आमच्याकडे व्हिडीओ अन्...'.