महाविकास आघाडीत जागांवरून एकमत का नाही? कशावरून आडले घोडे, ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट

Prakash Ambedkar attack On Mahavikas Aaghadi : महाविकास आघाडीत कशावरून बिघाडी सुरू आहे, याचा गौप्यस्फोट वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोरील आव्हानांचा ऊहपोह केला आहे. काय आहे आंबेडकरांचा दावा?

महाविकास आघाडीत जागांवरून एकमत का नाही? कशावरून आडले घोडे, ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट
प्रकाश आंबेडकर यांचा दावा काय
Follow us
| Updated on: Sep 28, 2024 | 10:50 AM

महाविकास आघाडीत गृहकलह सुरू असल्याचा दावा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी सुरू असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. आघाडीत जागा वाटपावर एकमत होत असले तरी मुंबईतील आणि राज्यातील काही जागांवर या तीनही घटक पक्षात अजून एकमत झालेले नाही. नेमका हाच धागा पकडून आघाडीत जागांवरून एकमत का नाही? कशावरून आडले घोडे याचा गौप्यस्फोट वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकरांचा दावा काय?

शरद पवार यांनी ठरवलं आहे की 88 जागेच्या खाली जागा घेणार नाही. काँग्रेस आणि शरद पवार गटाचा आता 244 जागांवर दावा होत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या वाट्यात अवघ्या 44 जागा सुटतं आहेत. त्यामुळे या फॉर्म्युल्यावर मोठा पेचप्रसंग होईल आणि राजकारण होईल, असा दावा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे यांच्यासमोर कसला पेच?

यात सर्वात मोठा पेच उद्धव ठाकरे समोर असेल, असा आंबेडकरांनी दावा केला आहे. एकत्रित सेनेत असताना जितक्या जागा मिळाल्या, तितक्या जागा त्यांना मिळतील का? याविषयी आंबेडकर यांनी चिंता व्यक्त केली. त्यामागे एक कारण त्यांनी समोर केले आहे. त्यानुसार लोकसा निकालानंतर राज्यात एक सर्व्हे करण्यात आला. त्यात शिवसेनेचे 5.3 मतदानापैकी 2.7 टक्के मतदान एकनाथ शिंदे यांच्याकडे लोकसभेनंतर वळले असे काँग्रेसमधील लोकांचे मत आहे, असा दावा आंबेडकरांनी केला. जागा वाटपात ठाकरे गटाला झुकत माप न मिळण्याचे हे एक कारण आणि त्यामुळे MVA त्यांच्यात संघर्ष सुरू आहे, असा दावा त्यांनी केला.

मराठा आंदोलनातील हा बदल टिपला

वंचितने पहिली यादी जाहीर केली. प्रचंड मोठा मोर्चा निघाला, चोपड्याला 30 तारखेला रॅली आहेय 6 ऑक्टोबरला नगपूरमध्ये आदिवासी परीषद आहे. त्यात इतर यादी जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आंदोलनातील एक महत्त्वपूर्ण बदल त्यांनी टिपला. त्याची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार, जरांगे यांनी काही मागण्या केल्या, त्यावेळी आपण तिथे होतो. त्यात एक बदल पहिला, मराठ्यांचे नेते शरद पवार असा उल्लेख होत आहे. मराठवाड्याचे लोन पश्चिम महाराष्ट्रात पोहचत आहे. आरक्षण जी परिषद झाली, त्यात विदर्भ हो नसल्याच खापर कुणबी समाजावर फोडले आहे. हा कुणबी समाज विदर्भवादी होण्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रवादी आहे हे राजकारणातील संकेत आहे, वेगवेगळा होत असलेला बदल पाहून पुढील बदल होत आहे, असे ते म्हणाले.

आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?
आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?.
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की....
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की.....
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड.
फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेला सलमानशी लग्न करायचंय?
फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेला सलमानशी लग्न करायचंय?.
सिनेट निकाल जाहीर, वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया,5 उमेदवार विजयी अन्...
सिनेट निकाल जाहीर, वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया,5 उमेदवार विजयी अन्....
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेन उघडल खातं
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेन उघडल खातं.
कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा
कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा.
लाडक्या बहिणीचा राग अनावर, कार्यालयाच्या तोडफोडीवर काय म्हणाले फडणवीस?
लाडक्या बहिणीचा राग अनावर, कार्यालयाच्या तोडफोडीवर काय म्हणाले फडणवीस?.
जसं काय राऊतांने सगळ्यांचे कपडे काढण्याचा अधिकार.., भाजप नेत्याची टीका
जसं काय राऊतांने सगळ्यांचे कपडे काढण्याचा अधिकार.., भाजप नेत्याची टीका.
अक्षयच्या दफनविधीला विरोध, मृतदेहाचं काय होणार? कोर्टाचे आदेश काय?
अक्षयच्या दफनविधीला विरोध, मृतदेहाचं काय होणार? कोर्टाचे आदेश काय?.