MLC ELECTION निवडणूक अविरोध करण्याचा प्रस्ताव, लवकरच निर्णय होणार – नाना पटोले

| Updated on: Nov 26, 2021 | 2:01 PM

मुंबई, कोल्हापूर, नागपूर, धुळे नंदूरबारची जागा अविरोध करण्यासाठी चर्चा सुरू आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यातून काहीतरी मार्ग निघेल, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

MLC ELECTION निवडणूक अविरोध करण्याचा प्रस्ताव, लवकरच निर्णय होणार - नाना पटोले
नाना पटोले
Follow us on

नागपूर : विधानपरिषद निवडणूक अविरोध करण्याबाबत प्रस्ताव आलाय. चर्चा सुरु आहे. तीन वाजेपर्यंत स्पष्टीकरण पुढे येईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. मुंबई, कोल्हापूर, नागपूर, धुळे नंदूरबारची जागा अविरोध करण्यासाठी चर्चा सुरू आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यातून काहीतरी मार्ग निघेल, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. टीव्ही ९ मराठीशी ते आज बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, मुठभर हिंदू सक्षम झालेत. बाकी तसेच राहिले. काँग्रेस संविधानाला मानणारा आहे. काँग्रेस संविधानाच्या विचाराने चालली आहे. मी स्वत: हिंदू आहे. या देशाच्या लोकशाहीत सर्व धर्माला घेऊन चालावं लागतं. काही लोक या व्यवस्थेला मक्तेदारी म्हणून चालत असेल तर ती मक्तेदारी राहू शकत नाही.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी प्रक्रिया सुरु झालीय. हा आमच्या स्ट्रॅटेजीचा प्लान आहे. भाजपनं फुस लावलेलं एसटीचं आंदोलन आहे. चर्चेतून मार्ग काढला जाईल, असं आश्वासन नाना पटोले यांनी दिलं. काँग्रेस एसटी कर्मचाऱ्यांसोबत आहे. भाजप देशात खाजगीकरण करायला निघालंय.

भाजपचे नगरसेवक जाणार सहलीला

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांना सहलीला घेऊन जाणार असल्याची माहिती आहे. शनिवारी वेगवेगळ्या शहरांमध्ये भाजपचे नगरसेवक जाणार आहेत. तेरा दिवसांनंतर ते सरळ मतदानाच्या पूर्वसंध्येला परत येतील, अशी माहिती आहे. कॉंग्रेसकडून ज्येष्ठ नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांनी उमेदवारी दाखल केली. डॉ. भोयर यांच्या उमेदवारीमुळे भाजपने सावध भूमिका घेतली. बुधवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवकांसोबत चर्चा केली. या सर्व नगरसेवक, नगरसेविकांना वेगवेगळ्या गटात विभागण्यात आले आहे. १५ ते २० नगरसेवकांचा एक गट तयार करण्यात आलाय. विधानसभानिहाय गट तयार करण्यात आले आहेत. विधानपरिषद निवडणुकीसाठी १० डिसेंबरला मतदान आहे. नगरसेवकांच्या अनुपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना प्रति नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.

भाजपमध्ये संघाची घराणेशाही, तिथं संघाच्या विचाराचा माणूस वर जातो, नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

Video नागपुरात लेखी हमीपत्र न मिळाल्यानं खासगी बस परतल्या, बसची तोडफोड झाल्यास एसटी मंडळाचा जबाबदारी घेण्यास नकार