नागपुरातील वृक्ष गणना नव्याने करण्याचे प्रस्तावित; किती असेल शहरात झाडांची संख्या?

नागपूर शहरातील वृक्ष संख्या 21 लाख 43 हजार 838 इतकी आहे. सद्य:स्थितीत नागपूरची वृक्षसंख्या 25 लाखांपेक्षा जास्त असल्याचे अनुमानित आहे. नागपूर शहर 222 स्क्वे.किमी भागात विस्तारित आहे.

नागपुरातील वृक्ष गणना नव्याने करण्याचे प्रस्तावित; किती असेल शहरात झाडांची संख्या?
नागपूर महानगरपालिकेअतंर्गत वयोश्री योजनेची सुरुवात करण्यात आली.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 5:00 AM

नागपूर : महाराष्ट्र (नागरीक्षेत्र) वृक्षसंवर्धन कायदा (Arboriculture Act) 1975 सेक्शन 7 (ब) अन्वये प्रत्येक 5 वर्षानंतर वृक्ष गणना करणे आवश्यक आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रथमत: वर्ष 2011 साली वृक्षगणना करण्यात आली. त्यानुसार नागपूर शहरातील वृक्ष संख्या (Number of trees in Nagpur city) 21 लाख 43 हजार 838 इतकी आहे. सद्य:स्थितीत नागपूरची वृक्षसंख्या 25 लाखांपेक्षा जास्त असल्याचे अनुमानित आहे. नागपूर शहर 222 स्क्वे.किमी भागात विस्तारित आहे. नागपूर शहराची नवीन प्रभाग रचनेनुसार व त्यात समाविष्ट करण्यात आलेली गावे हुडकेश्वर व नरसाळा (Hudkeshwar and Narsala) इत्यादीचा समावेश करून नव्याने वृक्ष गणना करण्याचे प्रस्तावित आहे. प्रस्तावित वृक्ष गणना GIS व GPS पध्दतीने करण्यात येईल. वृक्ष अधिनियम अन्वये नागपूर महानगरपालिका क्षेत्रा अंतर्गत असणारे वृक्ष, नवीन अधिनियम सुधार ऑगस्ट 2021 नुसार Heritage वृक्ष यांची संपूर्ण माहिती व संख्या, जैवविविधता कायदा 2002 नुसार PBR, CBI, LBSAP तयार करणे, इत्यादीचा समावेश सदर प्रस्तावात करण्यात आलेला आहे.

वृक्षगणनेसाठी लागणार एक वर्ष

प्रत्यक्ष वृक्ष गणना करण्याचे कामास एक वर्षे कालावधी लागणार आहे. त्यानंतर चार वर्षे त्यांची देखभाल व माहिती अद्ययावत करणे इत्यादीचा समावेश राहील. अश्याप्रकारच्या कामाकरिता पुणे, पिंपरी, चिंचवड, ठाणे इत्यादी महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या वृक्ष गणना प्रक्रियेच्या आधार घेण्यात आला आहे. अद्ययावत प्रकारे वृक्ष गणना करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रस्तावाकरिता तत्वत: मान्यता वृक्ष प्राधिकरण समितीच्या 15 डिसेंबर 2018 च्या बैठकीत देण्यात आली आहे.

खर्च पाच वर्षांत करायचाय

वरील कामासाठी लागणारा खर्च एकूण पाच वर्षात टप्याटप्याने करावयाचा आहे. त्यासाठी एकत्रित 600 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 60 टक्के रक्कम प्रथम दोन वर्षात व उर्वरित 40 टक्के रक्कम पुढील तीन वर्षात प्रति वर्षी 13.33 टक्के याप्रमाणे होईल. वृक्षांची संख्या 25 लाखांपेक्षा जास्त भरल्यास त्याकरिता अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल. वरील लागणारा खर्च दरवर्षी इमारत कर (Property Tax) यात समाविष्ट असलेल्या 1 टक्के वृक्ष कर या अंतर्गत प्राप्त रक्कमेतून करण्याचे प्रस्तावित आहे. त्या अंतर्गत साधारणत: दरवर्षी 300 लाखांपेक्षा जास्त होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत जमा वृक्ष कर 14 कोटी या रक्कमेतून वृक्षसंबंधित कार्य व वृक्ष जतन संवर्धन या कार्यासाठीच वापरली जाईल. वृक्ष गणनेच्या कामाकरीता सोबत जोडलेल्या निविदा अटी शर्तीनुसार विषयांकित कामाचा अनुभव असलेल्या संस्था-व्यक्ती यांच्याकडून नियमित ई-निविदा मागवून काम करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

Nagpur Crime | नागपुरात विजेचा शॅाक लागून बिबट्याचा मृत्यू; शेतात विद्युत करंट लावण्याचे कारण काय?

Nagpur | एका सुरेल युगाचा अंत; लतादीदींच्या निधनावर डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला शोक

नागपुरातील रस्त्यांच्या सफाईसाठी मेकॅनिकल रोड स्विपिंग मशीन; रात्रीच्या वेळी होणार प्रमुख मार्गांची स्वच्छता

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.