Nagpur | ओमिक्रॉनबाबत जनजागृती मोहीम : जिल्हाधिकाऱ्यांनी केले हँडबीलचे लोकार्पण; अफवा टाळण्याचे आवाहन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोशल मीडियावर मोठ्या अफवा पसरल्या. ओमिक्रॉनबाबत त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी जनजागृती राबविण्यात येत आहे. सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी स्टीकर्स, भिंतीपत्रक तयार केले. त्यांचे लोकार्पण जिल्हाधिकारी आर. विमला यांनी करून या मोहिमेचे उद्‍घाटन केले.

Nagpur | ओमिक्रॉनबाबत जनजागृती मोहीम : जिल्हाधिकाऱ्यांनी केले हँडबीलचे लोकार्पण; अफवा टाळण्याचे आवाहन
ओमिक्रॉनच्या जनजागृतीच्या हँडबिलचे लोकार्पण करताना जिल्हाधिकारी, बसवराज तेली व अजित पारसे.
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 8:22 PM

नागपूर : नागपुरातील पहिल्या ओमिक्रॉनबाधित रुग्णाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली. हे सुखद असले, तरी जनजागृती केली जात आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या हँडबिलचे लोकार्पण जिल्हाधिकारी आर. विमला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस उपायुक्त बसवराज तेली व सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे उपस्थित होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोशल मीडियावर मोठ्या अफवा पसरल्या. ओमिक्रॉनबाबत त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी जनजागृती राबविण्यात येत आहे. सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी स्टीकर्स, भिंतीपत्रक तयार केले. त्यांचे लोकार्पण जिल्हाधिकारी आर. विमला यांनी करून या मोहिमेचे उद्‍घाटन केले.

शहरात अफवांची शक्यता

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर अफवा, अर्धवट माहितीची पेरणी झाली. अफवांमधून नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमातून अनेकांना योग्य उपचार मिळू शकले नाही. यातही काही बळ गेले. प्रशासनाची पूर्ण ताकद त्यावेळी कोरोनाविरुद्ध लढण्यात होती. या अफवांवर नियंत्रण ठेवणे कठीण गेले. आता ओमिक्रॉनने शहरात शिरकाव केला. पुढे याबाबतही अशाच अफवांची शक्यता आहे.

नो अफवा @ ओमिक्रॉन कॅम्पेन

सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी नो अफवा @ ओमिक्रॉन कॅम्पेन ही मोहीम सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी आर. विमला यांना पत्र लिहिले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या मोहिमला हिरवी झेंडी दाखवली. ओमिक्रॉनबाबत पारसे यांनी तयार केलेल्या स्टिकर, हँडबिलचे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी बुधवारी लोकार्पण केले. यावेळी पोलीस उपायुक्त बसवराज तेली उपस्थित होते. ही मोहीम सोशल मीडियावर व्हीडिओ, पोस्ट, शिबिरे, पथनाट्यातून राबविण्यात येणार आहे. ओमिक्रॉनबाबत अर्धवट माहिती रोखणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं पारसे यांनी सांगितलं. याशिवाय ही मोहीम वेब नागपूर या संकेतस्थळावरूनही सुरू राहणार आहे. या संकेतस्थळावर निःशुल्क नोंदणी करून मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन पारसे यांनी केले आहे.

पोस्ट शेअर करताना विचार करावा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेगवेगळ्या अफवा उडाल्या होत्या. अनेकांपर्यंत उपचार आदीबाबत योग्य माहिती पोहोचली नाही. तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, या उद्देशाने जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या मोहिमेला हिरवी झेंडी दाखवली. नागरिकांनी ओमिक्रॉनबाबत कुठलीही माहिती, पोस्ट शेअर करताना विचार करावा, असं मत सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केले.

ओमिक्रॉन बाधिताची दुसरी चाचणी निगेटिव्ह

नागपुरातील पहिल्या ओमिक्रॉन बाधित रुग्णाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळं आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्व:स सोडला. रुग्णाची प्रकृती ठणठणित बरी झाली. रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. परंतु, नियमानुसार सात दिवस होम क्वारंटाईन राहावं लागेल. ओमिक्रॉनबाधित रुग्ण 5 डिसेंबरला आला होता. हा रुग्ण पश्चिम आफ्रिकेतून दिल्ली आणि त्यानंतर नागपुरात पोहोचला होता.

Nagpur crime | कामाच्या शोधात शहरात आला, सारखे आडनाव असल्यानं दिला आसरा, त्याने केली तिची बदनामी आणि…

Nagpur ACB | सहायक शिक्षकाला नियमित करण्यासाठी मागितले साडेसहा लाख, 50 हजारांची लाच घेताना मुख्याध्यापिकेस अटक

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.