Nagpur public awareness : नागपुरातील सावरकर चौकात जनजागृती, मनपा-ग्रीन व्हिजीलचा उपक्रम, एक तास अनावश्यक वीज दिवे बंद
विजेचं संकट आपल्यावर कोसळू नये. विजेचा योग्य वापर केला जावा. विजेची महत्त्व जनतेला समजावे हा या जनजागृतीमागचा उद्देश आहे.
नागपूर : पौर्णिमेच्या दिवसी रात्री एक तास वीज बंद केली, तरीही आपली काम होऊ शकतात. संपूर्ण शहरात हा उपक्रम राबविल्यास विजेची मोठ्या प्रमाणात बचत होती. ही संकल्पना नागपूर शहरात राबविली जाते. यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. यातून विजेची बचत होते. नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने बुधवारी सावरकर चौक (ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौक) परिसरात पौर्णिमा दिवसाच्या (full moon day) निमित्ताने जनजागृती करण्यात आली. पौर्णिमा दिवसा निमित्ताने वीज बचतीच्या जनजागृतीची संकल्पना तत्कालीन महापौर, माजी आमदार प्रा. अनिल सोले (Anil Sole) यांनी मांडली होती. त्यांच्या संकल्पनेनुसार अजूनही मनपा आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनद्वारे पौर्णिमा दिनानिमित्त शहरातील विविध भागात जनजागृतीचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी (citizen) या आवाहनाला प्रतिसाद दिला.
वीज बचतीचे सांगितले महत्त्व
जनजागृती उपक्रमादरम्यान ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील दुकाने, आस्थापनांना भेट दिली. तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले. नागरिकांना किमान एक तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. परिसरातील व्यापारी बांधवांनीही मनपा व ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. विद्युत दिवे बंद करून उपक्रमात आपले योगदान दर्शविले.
यांनी केली जनजागृती
ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात टीम लीडर सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, बिष्णुदेव यादव, श्रीया जोगे, सुजय काळबांडे, पारस जांगडे, साक्षी मुळेकर, शुभम येरखेडे, तुषार देशमुख आदींनी परिसरात जनजागृती केली. व्यापारी व नागरिकांना त्यांच्या प्रतिष्ठान व घरातील वीज दिवे एक तासांकरिता बंद करण्याची विनंती केली. या मोहिमेत मनपाचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र राठोड, विप्लब भगत यांच्यासह भोलानाथ सहारे, संजय दबळी, उपेंद्र वालदे, गुरमीत सिंग, अनिल झोडे, संदीप मानकर आदींनीही सहभाग नोंदविला. गेल्या दोन-तीन वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. याला नागरिकांचा प्रतिसाद मिळतो. विजेचं संकट आपल्यावर कोसळू नये. विजेचा योग्य वापर केला जावा. विजेची महत्त्व जनतेला समजावे हा या जनजागृतीमागचा उद्देश आहे.