Nagpur Cycle | नागपूर शहरात पब्लिक बायसिकल शेअरिंग; शासकीय कार्यालय परिसरात सायकल पार्किंग स्टँड

मोबाईल अॅपद्वारे सायकल बुक करून ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा राहणार आहेत. याकरिता ऑपरेटरद्वारे भाडे आकारण्यात येईल. ही प्रणाली जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि महामेट्रो रेल कार्पोरेशन सहाय्य करणार आहेत.

Nagpur Cycle | नागपूर शहरात पब्लिक बायसिकल शेअरिंग; शासकीय कार्यालय परिसरात सायकल पार्किंग स्टँड
नागपूर शहरातील सायकल स्टँडबाबत करार करताना मनपा आयुक्त व पदाधिकारी. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 8:50 AM

नागपूर : शहरात इंधनविरहित पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. यासाठी नागपूर महानगरपालिकेने महत्वाचे पाउल उचलले आहे. शहरात सायकल चालविण्यास प्रोत्साहन मिळावे, हा यामागचा उद्देश आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा, यासाठी शहरात विविध ठिकाणी सायकल स्टँड उभारण्यात येणार आहेत. यासंदर्भात नागपूर महानगरपालिका, महामेट्रो आणि शेअरिंग तत्वावर सायकल उपलब्ध करून देणा-या कंपनी मे. विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड ( Vidarbha Infotech Pvt. Ltd.) आणि मे. ग्रीन पीडिया बाईक शेअर प्रायव्हेट लिमिटेड (Green Pedia Bike Share Pvt. Ltd.) यांच्यामध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहात गुरुवारी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. (Administrator Radhakrishnan b.) यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, बायसिकल मेयर डॉ. अमित समर्थ, महामेट्रोचे महाव्यवस्थापक सुधाकर उराडे, संयुक्त महाप्रबंधक महेश गुप्ता, मनपाचे वाहतूक अभियंता श्रीकांत देशपांडे, विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रशांत उगेमुगे, माय बाईकचे श्रेयस शाह, महामेट्रोचे अधिकारी दिलीप वराडे, दिलीप वरकड, रवींद्र परांजपे आदी उपस्थित होते.

मोबाईल अॅप्सद्वारे सायकल बुक

या करारानुसार दोन्ही ऑपरेटर कंपनीद्वारे नागपूर शहरात विविध ठिकाणी सायकल स्टॅन्ड लावून नागरिकांसाठी सायकली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याद्वारे शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये, रहिवासी एरिया, शॉपिंग मॉल्स, थिएटर, मल्टी प्लेक्स, बाजाराचा एरीया, मेट्रो स्टेशन्स, बस स्टँड्स, बगीचे, पार्क, सार्वजनिक स्थाने इत्यादी ठिकाणी बायसिकल्स उपलब्ध करून देण्याची योजना आहे. मोबाईल अॅपद्वारे सायकल बुक करून ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा राहणार आहेत. याकरिता ऑपरेटरद्वारे भाडे आकारण्यात येईल. ही प्रणाली जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि महामेट्रो रेल कार्पोरेशन सहाय्य करणार आहेत.

सायकल पार्किंगसाठी हवी हक्काची जागा

नागपूर शहरात माय बाईक कंपनीद्वारे मेट्रो स्टेशनवर तर महा मेट्रोतर्फे शहरातील वेगवेगळ्या भागात लावण्यात आलेल्या सायकल स्टँडबाबत यावेळी मनपा आयुक्त यांनी आढावा घेतला. सध्या लावण्यात आलेले सायकल स्टँड हे प्रत्येक सायकलसाठी योग्य ठरत नाही. त्यामुळे सध्याच्या सायकल स्टँडची डिझाईन बदलविण्याची सूचना बायसिकल मेयर डॉ. अमित समर्थ यांनी केली. नागरिकांना सहजरित्या सायकल उपलब्ध व्हावी, त्यांना जवळच्या ठिकाणाहून शहरातील कोणत्याही भागात जाता यावे यासाठी चागंले आकर्षक सायकल स्टँड असणे आवश्यक आहे. बायसिकल शेअरिंग प्रणालीद्वारे स्टँडवरील सायकल इतरांना वापरता येईलच. मात्र याशिवाय स्वत:च्या सायकलने येणा-या व्यक्तींनाही सायकल पार्किंगसाठी हक्काची जागा असणे आवश्यक आहे. यादृष्टीने विचार करून शहरातील महत्वाचे बाजार, मॉल व ज्या ठिकाणी जास्तीत जास्त नागरिकांची ये-जा असते. अशा सर्व ठिकाणी बायसिकल शेअरिंगसह नागरिकांना त्यांच्या सायकलही नि:शुल्क पार्क करता यावे यासाठी नवीन डिझाईनचे सायकल स्टँड लावण्याबाबत आयुक्तांनी निर्देश दिले.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....