Godrej Properties | गोदरेज प्रॉपर्टीजची नागपुरात जमीन खरेदी, विमानतळालगत 58 एकर जागा प्लाट्ससाठी

आम्ही या नवीन प्रोजेक्टमुळं आनंदी आहोत. देशात महत्त्वाच्या ठिकाणी राहण्यायोग्य जागेतली ही गुंतवणूक आहे. त्यामुळं आमचं अस्तित्व अधिक मजबूत होणार आहे. या रहिवासी जागेत चांगल्या जीवनमानासाठी आम्ही सेवा पुरविणार आहोत.

Godrej Properties | गोदरेज प्रॉपर्टीजची नागपुरात जमीन खरेदी, विमानतळालगत 58 एकर जागा प्लाट्ससाठी
समृद्धी महामार्ग
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 12:58 PM

नागपूर : गोदरेज प्रॉपर्टीजनं (Godrej Properties) नागपुरात मोठी गुंतवणूक केलीय. 1.5 मिलीयन स्वेअर फूट जागा प्लाटिंगसाठी खरेदी केली. विशेष म्हणजे ही जागा नागपूर विमानतळाच्या जवळ नागपूर-हैदराबाद (Nagpur-Hyderabad) महामार्गावर आहे. गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जीपीएल) गुरुवारी सांगितलं की, नागपुरात 58 एकर जागा खरेदी केली. या जागेचा वापर प्लाटिंगसाठी करण्यात येणार आहे. ही जागा नागपूर विमानतळालगत (Near Nagpur Airport) नागपूर-हैदराबाद महामार्गावर आहे. जीपीएलनी सांगितलं की, नागपुरात विशेषतः मेट्रो रेल प्रोजेक्ट, आयटी, मिहान सेझमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणि एअरपोर्ट कार्बो हब आहे. समृद्धी महामार्गामुळं या भागाला बुस्ट मिळणार आहे. कनेक्टिव्हीटी वाढल्यामुळं राहण्याच्या जागेचीही मागणी वाढणार आहे.

मार्चमध्ये सोनिपतमध्ये 50 एकर जागा

जीपीएलचे एमडी तथा सीईओ म्हणाले, आम्ही या नवीन प्रोजेक्टमुळं आनंदी आहोत. देशात महत्त्वाच्या ठिकाणी राहण्यायोग्य जागेतली ही गुंतवणूक आहे. त्यामुळं आमचं अस्तित्व अधिक मजबूत होणार आहे. या रहिवासी जागेत चांगल्या जीवनमानासाठी आम्ही सेवा पुरविणार आहोत. मार्चमध्ये कंपनीनं हरियाणातील सोनिपतमध्ये 50 एकर जागा संपादित केली. हीसुद्धा प्लाटिंगच्या दृष्टिकोणातून जागा खरेदी करण्यात आली.

मुंबईत मुख्यालय

गोदरेज प्रॉपर्टीजनं नागपुरात गुंतवणूक केल्यानं जमिनीच्या भावात वाढ होणार आहे. ही जागा समृद्धी महामार्गालगत असल्यानं प्लाटिंगला चांगली संधी आहे. याठिकाणी रहिवाशांची संख्या वाढेल, हे हेरून गोदरेज प्रापर्टीजनं ही गुंतवणूक केली आहे. गोदरेज प्रॉपर्टी लिमिटेड ही रिअल इस्टेटमध्ये काम करणारी कंपनी आहे. मुंबईत त्यांचं मुख्यालय आहे. 1990 मध्ये या कंपनीची स्थापना आदी गोदरेज यांच्या नेतृत्तात झाली. गोदरेज प्रापर्टी लिमिटेड ही कंपनी बाँबे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे लिस्टेड आहे.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.