Nagpur Crime | पिपरी शिवारात जुगार अड्ड्यावर धाड, गुन्हे शाखेची कारवाई, 3 आरोपी जेरबंद

कुही पोलीस स्थानकाअंतर्गत पिपरी शिवारात जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी धाड टाकली. नागपूर ग्रामीण शाखेच्या गुन्हे शाखेच्या धाडीत तीन आरोपींना अटक करण्यात आली. एक मोफेड अॅक्टिवा, नगदी बावीस हजार रुपये असा एकूण दोन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Nagpur Crime | पिपरी शिवारात जुगार अड्ड्यावर धाड, गुन्हे शाखेची कारवाई, 3 आरोपी जेरबंद
जुगार अड्ड्यावर धाड मारून आरोपींना अटक करणारे नागपूर ग्रामीणचे पोलीस.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 1:57 PM

नागपूर : नागपूर ग्रामीण पोलिसांचे (Nagpur Rural Police) गुन्हे शाखेचे पथक उमरेड उपविभागात गस्त घालत होते. कुही तालुक्यातील पिपरी शिवारात जुगार सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. व्यंकटेश सिटीच्या पडीत ले-आउटमध्ये हे अवैध धंदे सुरू होते. या ठिकाणी धाड टाकली असता पोलिसांनी खेडी येथील शैलैंद्र चिकटे, खलासना येथील संकेत पारधी, अजनी येथील प्रज्ज्वल गिरी यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ओमनी व्हॅन जप्त करण्यात आली. अॅक्टिवा तसेच बावीस हजार रुपये नगदी जप्त करण्यात आले. ही कारवाई ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर (Superintendent of Police Vijay Kumar Magar), अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर (Superintendent of Police Rahul Makanikar ) यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, चंद्रशेखर गडेकर, मदन पटले, महेश जाधव, बालाजी साखरे, अजीज दूधकनोज, अमृत किंगे, मयूर ढेकळे यांच्या पथकाने केली.

जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांना अटक

दुसऱ्या एका घटनेत, कन्हान पोलीस ठाण्याअंतर्गत जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या अटक करण्यात आली. कन्हान पोलिसांनी कंटेनरची पाहणी केली. कंटेनरमध्ये काळा रंगाचे 36 बैल, पांढऱ्या रंगाचे 23 बैल, लाल रंगाचे पाच असे एकूण 64 बैल सापडले. तसेच पाच बैल मृतावस्थेत सापडले. एका बैलाची किंमत सुमारे पंधरा हजार रुपये पकडले तरी दहा लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे बैल कंटेनरमध्ये कोंबून नेले जात होते. या कंटेनरची किंमत सुमारे वीस हजार रुपये आहे. जीवंत गोवंशाला देवलापार येथील देखभालीसाठी विज्ञान अनुसंधान केंद्रात पाठविण्यात आले आहे. तसेच मृत बैलांचे शवविच्छेदन देवलापार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. या प्रकरणी भोपाल येथील मनोज मिना, जुनैद खान, जावेद खान यांना अटक करण्यात आली आहे. कन्हान पोलिसांनी आरोपींविरोधात प्राणी अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्त्यात बागवान यांच्या मार्गदर्शनात कन्हानचे ठाणेदार काळे, सतीश मेश्राम, विशाल शंभरकर, मंगेश सोनटक्के, नवीन पाटील, शरद गिरके, आशीष मानवटकर, दीपक कश्यप यांनी केली.

आधी फेसबूकवरून मैत्री नंतर ऑनलाईन चॅटिंग, मिटिंग आणि…! नागपुरातील विवाहितेची पोलिसांत धाव

सनफ्लॉवर हॉस्पिटलवर 1 लाख रुपयांचा दंड, नागपूर मनपाने का केली कारवाई?

Video – Amravati Fire | भंगाराच्या गोदामाला भीषण आग! चांदुरबाजारच्या रहिवासी भागात धुळीचे लोट

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.