नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ काळ्या बिबट्या, तुम्हीही झलक पाहाच…
नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील नवेगाव क्षेत्रात दुर्मीळ काळा बिबट्या आढळलाय. या काळ्या बिबट्याबरोबर एक सामान्य बिबट्याही संचार दिसून आला. (Rare black leopard in Navegaon-Nagzira tiger project)
नागपूर : नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील नवेगाव क्षेत्रात दुर्मीळ काळा बिबट्या आढळलाय. या काळ्या बिबट्याबरोबर एक सामान्य बिबट्याही संचार दिसून आला. या दुर्मिळ जातीच्या बिबट्याला पाहण्यासाठी पर्यटक आसुसले होते. अखेर काळ्या बिबट्याने पर्यटकांना दर्शन दिलं आहे. (Rare black leopard in Navegaon-Nagzira tiger project)
भारतीय वन्यजीव संस्थेचे वैज्ञानिक डॉ. बिलाल हबीब यांनी ‘ट्विटर’वर छायाचित्र प्रसारित केल्यानंतर नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात काळा बिबट्या आढळल्याची माहिती पुढे आलीय. पेंच व्याघ्रप्रकल्पात पहिल्यांदा पर्यटकांना काळा बिबट्या दिसलाय, पण या बिबट्याचं दर्शन काही सेकंदांचेच होते, त्यामुळे त्यांचे छायाचित्र काढता आले नव्हते.
त्यानंतर मात्र पर्यटकांच्या कॅमेऱ्यांनी त्याला कैद केले. तेव्हापासून काळ्या बिबट्याला पाहण्यासाठी ताडोबाकडे जाणारे पर्यटक नंतर पेंच व्याघ्रप्रकल्पाकडे वळू लागलेत.
(Rare black leopard in Navegaon-Nagzira tiger project)
हे ही वाचा :
अंजिठा लेणीवर बिबट्याचा वावर, वैजापूरमध्ये दोघांवर हल्ला, औरंगाबादेत खळबळ