राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा मोठा निर्णय, परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा संधी, ‘या’ तारखेपासून फेरपरीक्षा
उन्हाळी परिक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार परत एक संधी देण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनानं घेतला आहे. 14 ॲागस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान होणार फेरपरीक्षेचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आलीय.
नागपूर: ऑनलाईन परीक्षांपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर यांच्यावतीनं महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 2021 च्या उन्हाळी सत्रातील परीक्षा काही कारणांमुळे न देता आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या परीक्षा 14 ऑगस्ट पासून सुरु होणार असून 1 सप्टेंबरला संपणार आहेत.
विद्यार्थ्यांना एक संधी मिळणार
उन्हाळी परिक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार परत एक संधी देण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनानं घेतला आहे. 14 ॲागस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान होणार फेरपरीक्षेचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आलीय.
20 हून अधिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून 20 पेक्षा जास्त अभ्यासक्रमांच्या ॲानलाईन फेरपरिक्षा घेण्या येणीर आहेत. काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडथळ्यांमुळे परिक्षा देता आली नव्हती. तर, काही विद्यार्थ्यांचे पेपर तांत्रिक कारणांमुळे सबमिट झाले नव्हते. विद्यापीठ प्रशासन आणि परीक्षा विभागाच्या या निर्णयामुळे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वी विद्यापीठाकडून परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले होते. निकाल जाही झाल्यानंतर बीए भाग १ च्या निकालामध्ये 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना परिक्षेत अनुपस्थित दाखवण्यात आलं होतं. परिक्षा देऊनही अनुपस्थित दाखवल्याने विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढलं होतं. याबाबतच्या 300 पेक्षा जास्त तक्रारी नागपूर विद्यापीठाच्या परिक्षा विभागाकडे आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या तक्रारीवर स्पष्टीकरण देताना विद्यापीठाकडून माहिती देण्यात आली होती. “ॲानलाईन परिक्षा देताना प्रत्येक प्रश्न सेव्ह न केल्याने, परिक्षा देताना सोशल माध्यमांच्या आलेल्या नोटीफीकेशनमुळे विद्यार्थ्यांचे पेपर ब्लॅाक झाले. त्यामुळे अनुपस्थित दाखवल्यांचं विद्यापीठाच्या परिक्षा विभागाने सांगितलंय. या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, असं विद्यापीठाचे परिक्षा नियंत्रक प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले होते. त्याप्रमाणं आता फेर परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे.
इतर बातम्या:
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University declare reexam schedule for student who miss regular exam