Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Ration | रेशनच्या धान्याची खुल्या बाजारात विक्री, रात्री दोन वाजता पोलिसांची कारवाई, नागपुरात ग्राहकांकडून पडत्या भावात खरेदी

नागपूरच्या नंदनवन पोलिसांनी हसनबागमध्ये सापळा रचला. या सापळ्यात रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजाराचा पर्दाफाश केला. ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. 15 लाख रुपयांचा गहू-तांदूळ जप्त करण्यात आला.

Nagpur Ration | रेशनच्या धान्याची खुल्या बाजारात विक्री, रात्री दोन वाजता पोलिसांची कारवाई, नागपुरात ग्राहकांकडून पडत्या भावात खरेदी
रात्री दोन वाजता पोलिसांची कारवाईImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 3:19 PM

नागपूर : नंदनवन पोलिसांना (Nandanvan Police) रेशनिंगचे धान्य काळाबाजारात जात असल्याचं रात्री कळलं. एका ट्रकमधून हा रेशनिंगचा माल जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. हसनबाग चौकाकडे (Hasanbagh Chowk) येणाऱ्या मार्गावर सापळा लावण्यात आला. रात्री दोनच्या सुमारास एका ट्रकला एम एच 40 सी डी 7005 या ट्रकला थांबविण्यात आले. जावेद शेख उर्फ बाबू शेख या ट्रक चालकाची चौकशी करण्यात आली. ट्रकमध्ये गहू व तांदळाचे पोते होते. त्याबाबत कुठलाही कागद बिल किंवा ऑर्डरची कॉपी नव्हती. पोलिसांनी खाक्या दाखविल्यावर ताजबाग परिसरातून (Tajbagh Premises) ही पोती ट्रकमध्ये भरून कळमन्यात विक्रीसाठी घेऊन जात होते. याची ट्रकचालकाने कबुली दिली. पोलिसानी अन्न पुरवठा विभागाला याची माहिती दिली. सगळा माल जप्त केला, अशी माहिती नंदनवनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक भिकाडे यांनी दिली.

15 लाखांचे धान्य जप्त

नागपूरच्या नंदनवन पोलिसांनी हसनबागमध्ये सापळा रचला. या सापळ्यात रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजाराचा पर्दाफाश केला. ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. 15 लाख रुपयांचा गहू-तांदूळ जप्त करण्यात आला. नागरिकांच्या हक्काचं सरकारी स्वस्त धान्य काळाबाजारी करत विकण्याचा गोरखधंदा या ठिकाणी सुरू आहे. या आधी सुद्धा अशा घटना घडल्या असल्याने याचे मूळ शोधून काढण्याची गरज आहे.

गहू, तांदुळ 13-14 रुपये किलो

नागपुरात रेशनचे गहू, तांदुळ घरी आणले जातात. पण, ते खाण्याच्या योग्यतेचे राहत नाहीत. त्यामुळं ते व्यापारी कमी भावात खरेदी करतात. 13-14 रुपये किलो गहू, तांदुळ घरोघरी जाऊन खरेदी केले जातात. मोठा व्यापारी या धान्याची योग्य विल्हेवाट लावतो. त्यानंतर ते बाजारात विक्री करतो. यातून मोठ्या प्रमाणात व्यापारी तयार झाले आहे. ताजबागमध्ये याचे गोदाम असल्याची माहिती आहे. पण, हे व्यापारी राजकीय नेत्यांशी संबंधित असल्यानं त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. अन्न पुरवठा अधिकाऱ्यांचेही या व्यापाऱ्यांशी सुमधूर संबंध असल्याशिवाय हे सारे राजरोसपणे कसे सुरू राहू शकेल, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.