Video – Nagpur | ट्रान्झिट रिमांडवर आलेले रवी राणा म्हणतात, आता दुसऱ्या मंत्र्यालाही ईडी अटक करेल, आता कुणाचा नंबर?

अमरावतीच्या पालकमंत्री यांचा 1200 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस येईल. ईडी त्याचा तपास करत आहे. सीएम आणि त्यांच्या अवतीभवती घुटमळणाऱ्या अनिल परब यांचे घोटाळे देखील समोर येतील, असंही रवी राणा म्हणाले.

Video - Nagpur | ट्रान्झिट रिमांडवर आलेले रवी राणा म्हणतात, आता दुसऱ्या मंत्र्यालाही ईडी अटक करेल, आता कुणाचा नंबर?
पंधरा दिवसांनंतर राज्यात परतणारे आमदार रवी राणा नागपूर विमानतळावर.
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 2:38 PM

नागपूर : आजची स्थिती पाहता महाराष्ट्र सरकार अस्थिर आहे. राज्याचे मंत्री अनिल परब (Minister Anil Parab) यांची फाईल तयार आहे. लवकरच त्यांना ईडी अटक करेल. राज्य सरकार कोसळणार असून, महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागणार आहे. षडयंत्र करून माझ्यावर गुन्हा दाखल केलाय. मी अमरावतीत नसतानाही पालकमंत्री यांनी कट रचून माझ्या विरोधत षडयंत्र केले. माझ्या विरोधात 307 सारखे खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व मुख्यमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री (Amravati Guardian Minister) यांच्या दबावात झाले. जर महविकास आघाडी खोटे गुन्हा दाखल करून आमदाराला फसवत असेल तर सामान्य जनतेचे काय. महाविकास आघाडीच्या नेत्यांना याचा जबाब द्यावा लागेल. या सरकारचे अनेक मंत्री ईडीच्या रडारवर आहेत, असा गौप्यस्फोट आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला.

गुन्हा दाखल करणाऱ्यांवर मानहानीचा दावा ठोकणार

आमदार रवी राणा पंधरा दिवसांनंतर आपल्या मतदारसंघात जात आहेत. ते दिल्लीहून नागपूर विमानतळावर आले. तेव्हा राणा म्हणाले, मी दिल्लीत असताना माझ्यावर 307 चा गुन्हा दाखल करतात ही माझी फसवणूक आहे. आज मी दिल्लीतील न्यायालयातून ट्रान्झिट बेल घेऊन राज्यात आलो आहे. खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यांचा 1200 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस येईल. ईडी त्याचा तपास करत आहे. सीएम आणि त्यांच्या अवतीभवती घुटमळणाऱ्या अनिल परब यांचे घोटाळे देखील समोर येतील.

पोलिसांविरोधात निषेध रॅली काढणार

अमरावती महापालिकेने शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री छन्नी हातोडीने तोडला. त्यांच्यावर कारवाई न करता मी दिल्लीत असताना माझ्यावर कारवाई करण्यात आली. पंधरा दिवसांनंतर मी अमरावतीमध्ये जात आहे. त्याठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करणार. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करणार. त्यानंतर प्रशासनाविरोधात निषेध रॅली काढण्यात येईल. पोलीस विभाग आणि सरकारनं मला फसविण्याचा प्रयत्न केला. याचा निषेध करणार असल्याचं रवी राणा म्हणाले.

पाहा व्हिडीओ

Photo | नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, नागपुरात भाजप आक्रमक, अंडरवर्डशी संबंध असल्याचा आरोप

Video – Amravati | मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदोलन, महिला पोलीस अधिकाऱ्यांशी शाब्दिक बाचाबाची, भाजप नेते अनिल बोंडेंची जीभ घसरली

Nagpur School | भीक मागा नि फीस भरा! मुख्याध्यापिकेची पालकांना धमकी, शिक्षण विभाग काय कारवाई करणार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.