रविकांत तुपकर यांचे बुलडाण्यातून आंदोलन, नागपूर पोलिसांनी घेतले होते ताब्यात
रविकांत तुपकर यांचे आंदोलन शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. पोलीस त्यांना ताब्यात घेऊन आंदोलन दडपण्याच प्रयत्न करीत आहेत, असा आरोप स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलाय. पोलीस राजकीय नेत्यांच्या सभांना परवानगी देतात. मग, आंदोलन करणाऱ्यांना अटक कशी केली जाते, असा सवाल राजू शेट्टी यांनी केलाय.
नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी आता बुलडाण्यातून अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवले. रात्री नागपूर पोलिसांनी तुपकर यांना ताब्यात घेऊन बुलडाण्यात सोडले होते. जमावबंदीचा आदेश शहरात लागू असताना कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न पोलिसांनी उपस्थित केला होता. कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा, यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
रविकांत तुपकर यांचे आंदोलन शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. पोलीस त्यांना ताब्यात घेऊन आंदोलन दडपण्याच प्रयत्न करीत आहेत, असा आरोप स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलाय. पोलीस राजकीय नेत्यांच्या सभांना परवानगी देतात. मग, आंदोलन करणाऱ्यांना अटक कशी केली जाते, असा सवाल राजू शेट्टी यांनी केलाय.
आंदोलन सुरूच ठेवा – तुपकर
बुलडाण्यातून अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना विदर्भात आंदोलन सुरूच ठेवण्याचे आवाहन केले आहे. 18 नोव्हेंबरला गावांमध्ये प्रभारफेरी काढा, 19 नोव्हेंबरला चक्काजाम आंदोलन करा आणि 20 नोव्हेंबरला ठरल्यानुसार गाव बंद आंदोलन करा, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
कापूस, सोयाबीनला भाव मिळावा
सोयाबीनवर केंद्रानं जीएसटी लावला आहे. केंद्र व राज्य सरकार एकाच भाषेत बोलत आहेत का, याचा जाहीर निषेध करतो, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली. आंदोलन सुरूच राहणार असल्याचं ते म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी नागपुरात अन्नत्याग आंदोलन बुधवारपासून सुरू केलं होतं. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, अशी त्यांची मागणी आहे.
सोयापेंड आयातीचा भावावर परिणाम
कापसाला 12 हजार रुपये आणि सोयाबीनला 8 हजार रुपये भाव मिळावा, अशी संघटनेची मागणी आहे. सरकारनं सोयापेंड आयात केल्यामुळं सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत. पाऊस आणि अतिवृष्टीनं उत्पादनही प्रभावित झाले आहे. पीक विमा करणे, विमा कंपन्यांवर कारवाई करणे, वीज कनेक्शन न कापणे, अशा काही मागण्या तुपकर यांनी सरकारकडं केल्या आहेत. हे आंदोलन विदर्भभर सुरू राहणार असल्याचं तुपकर म्हणाले.
कुरिअर उघडताच सावधान! नागपुरात चक्क कुरिअरमधून विषारी कोब्य्राचं पार्सल, कुणाला संपवण्याचा घाट?
‘अनिल देशमुखांनी राष्ट्रवादीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली’, पवारांकडून कौतुक; भाजपवर जोरदार हल्लाबोल