Video leaders’ reel funda | सोशल मीडियावर राजकीय रिलची चर्चा; फडणवीस, अजित दादा, मुख्यमंत्र्यांचेही रिल
रिल म्हणजे सोशल मीडियावरील छोटे व्हिडीओ. प्रचार सोपा, स्वस्त, आणि प्रभावी व्हावा, यासाठी रिल हा फंडा आहे. नेते मंडळीही रिलच्या प्रेमात पडलेत. नेत्यांचे भाषण, कार्यक्रम, प्रकाराचे रिल राहतात. सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसेंच्या अभ्यासातून हा निष्कर्ष पुढं आलाय.
नागपूर : मोबाईल हातात घेतला, की सोशल मीडियावरचे (Social Media) रिल आपल्याकडे लक्ष वेधून घेतात. सोशल मीडिया वापरणारे निम्मे लोक रोज हे रिल बघतात. या रिलची वाढती पॅाप्यूलॅरिटी बघता आता राजकीय नेते (Political leaders) मंडळीही या रिलच्या प्रेमात पडलेय. सध्या सोशल मीडियावर राजकीय नेत्यांच्या रिलने अक्षरशा धुमाकुळ घातलाय. देशाच्या सर्वोच्च नेत्यापासून ते आपल्या गल्लीतील नेत्यापर्यंत विविध प्रकारचे रिल सोशल मीडियावर पहायला मिळतात. याच रिलच्या माध्यमातून अनेक नेते मंडळी प्रचार, प्रसिद्धी, आणि प्रोग्राम लाखो लोकांपर्यंत पोहोचवतात. असा निष्कर्ष सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे (Ajit Parse) यांच्या अभ्यासातून पुढे आलाय.
टिकटॉकची जागा रिलने घेतली
रिल म्हणजे सोशल मीडियावरील शॅार्ट व्हिडीओ, पूर्वी टिकटॅाक होतं. आता त्याची जागा भारतीय रिलने घेतलीय. डान्सचे व्हिडीओ टाकण्यापासून रिलची भारतात प्रसिद्धी व्हायला लागली. आता देशात कोट्यवधी लोक रोज रिल बघतात. त्यामुळे प्रचाराचं सोपं, निःशुल्क आणि प्रभावी माध्यम म्हणून नेते मंडळी स्वतः आपले रिल तयार करायला लागलेय. तर काही कार्यकर्ते आपल्या नेत्यांचे रिल तयार करुन व्हायरल करतात.
पाहा व्हिडीओ
राज्यातील हे नेते करतात रिलचा वापर
महाराष्ट्राचा विचार केला तर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अजित दादा यांच्यासह अनेक नेत्यांचे रिल सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. देशपातळीवरील अनेक नेत्यांचे रिल तयार केले जातात. काही राजकीय पक्षांनी रील तयार करण्यासाठी स्पेशल टीम ठेवल्याय. त्यामुळे राजकीय प्रचाराचं एक प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियावरील रिल प्रभावी आहे. असं अजितर पारसे यांचं म्हणणंय.
नवी मुंबईत अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून संबंध ठेवणाऱ्या नराधमला अटक
दरोडेखोराचा फिल्मी स्टाईल पाठलाग, जखमी होऊनही पोलिसाने गचांडी धरलीच, कसारा घाटात थरारनाट्य