Nagpur Crime | व्यवसाय चालेना, प्रकृती अस्वास्थ्य; नैराश्य आल्याने वकिलाचा घातक निर्णय, अंबाझरी तलावात सापडला मृतदेह

गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्यात होते. फारसे कुणाशी बोलत नसतं. दोन दिवसांपूर्वी ते सायंकाळी नेहमीप्रमाणे फिरायला गेले. त्यावेळी त्यांनी अंबाझरी तलावात उडी घेऊन स्वतःला संपविले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह सापडला.

Nagpur Crime | व्यवसाय चालेना, प्रकृती अस्वास्थ्य; नैराश्य आल्याने वकिलाचा घातक निर्णय, अंबाझरी तलावात सापडला मृतदेह
अंबाझरी तलावात सापडला मृतदेहImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 12:42 PM

नागपूर : शहरातील अंबाझरी तलावात एका वकिलाने उडी घेत आत्महत्या केली. चंदननगर (Chandannagar) येथील प्रवीण केशवराव तपासे असं मृतक वकिलाचे नाव आहे. प्रवीण तपासे हे काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचे बोलले जाते. डिप्रेशनमध्ये (Depression) असल्यामुळे ते कोणाशीच बोलत नव्हते. तसेच त्यांच्यावर मोठे कर्जही असल्याची माहिती आहे. वकिली जास्त चालत नसल्यामुळे डिप्रेशनमध्ये आले. त्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. 26 मे 2022 रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तपासे हे जिल्हा न्यायालय (District Court) परिसरात नोटरी आणि कोर्टाची कामे करायचे. कोरोना काळात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची तब्येत नेहमी खराब राहायची. एकीकडं व्यवसाय चालत नव्हता. दुसरीकडं आरोग्य साथ देत नव्हते. त्यातून त्यांच्यावर मानसिक तणाव निर्माण झाला होता.

फिरायला गेले ते परत आलेच नाही

रोज सायंकाळी घरून निघून आणि रात्री साडेनऊ वाजता घरी परत येत होते. बुधवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे फिरायला घराबाहेर गेले. मात्र, रात्री बराच उशीर झाल्यावरही ते परतले नाही. कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केली. गुरुवारी सकाळी नऊ वाजता त्यांना अंबाझरी पोलीस ठाण्यातून फोन आला. या फोनवर त्यांनी दुःखत बातमी मिळाली. प्रवीण तपासे यांना दोन मुले आहेत. त्यापैकी एक मुलगा तिसरीत तर मुलगी अभियांत्रिकीला शिकते. पोलिसांनी प्राथमिक तपासात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

तलावात उडी घेऊन स्वतःला संपविले

प्रवीण तपासे हे जिल्हा न्यायालय परिसरात वकील होते. पण, कोरोना काळात त्यांना लागण झाली. तेव्हापासून त्यांची तब्यत बरी राहत नव्हती. त्यामुळं त्यांना नेहमी औषधी खरेदी करावी लागायची. दरम्यान, त्यांच्या वकिली व्यवसायातही थंड प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्यात होते. फारसे कुणाशी बोलत नसतं. दोन दिवसांपूर्वी ते सायंकाळी नेहमीप्रमाणे फिरायला गेले. त्यावेळी त्यांनी अंबाझरी तलावात उडी घेऊन स्वतःला संपविले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह सापडला.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.