नागपूर : शहरातील अंबाझरी तलावात एका वकिलाने उडी घेत आत्महत्या केली. चंदननगर (Chandannagar) येथील प्रवीण केशवराव तपासे असं मृतक वकिलाचे नाव आहे. प्रवीण तपासे हे काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचे बोलले जाते. डिप्रेशनमध्ये (Depression) असल्यामुळे ते कोणाशीच बोलत नव्हते. तसेच त्यांच्यावर मोठे कर्जही असल्याची माहिती आहे. वकिली जास्त चालत नसल्यामुळे डिप्रेशनमध्ये आले. त्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. 26 मे 2022 रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तपासे हे जिल्हा न्यायालय (District Court) परिसरात नोटरी आणि कोर्टाची कामे करायचे. कोरोना काळात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची तब्येत नेहमी खराब राहायची. एकीकडं व्यवसाय चालत नव्हता. दुसरीकडं आरोग्य साथ देत नव्हते. त्यातून त्यांच्यावर मानसिक तणाव निर्माण झाला होता.
रोज सायंकाळी घरून निघून आणि रात्री साडेनऊ वाजता घरी परत येत होते. बुधवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे फिरायला घराबाहेर गेले. मात्र, रात्री बराच उशीर झाल्यावरही ते परतले नाही. कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केली. गुरुवारी सकाळी नऊ वाजता त्यांना अंबाझरी पोलीस ठाण्यातून फोन आला. या फोनवर त्यांनी दुःखत बातमी मिळाली. प्रवीण तपासे यांना दोन मुले आहेत. त्यापैकी एक मुलगा तिसरीत तर मुलगी अभियांत्रिकीला शिकते. पोलिसांनी प्राथमिक तपासात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
प्रवीण तपासे हे जिल्हा न्यायालय परिसरात वकील होते. पण, कोरोना काळात त्यांना लागण झाली. तेव्हापासून त्यांची तब्यत बरी राहत नव्हती. त्यामुळं त्यांना नेहमी औषधी खरेदी करावी लागायची. दरम्यान, त्यांच्या वकिली व्यवसायातही थंड प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्यात होते. फारसे कुणाशी बोलत नसतं. दोन दिवसांपूर्वी ते सायंकाळी नेहमीप्रमाणे फिरायला गेले. त्यावेळी त्यांनी अंबाझरी तलावात उडी घेऊन स्वतःला संपविले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह सापडला.