Nagpur Yoga | वयाच्या सातव्या वर्षी चक्रासनात विक्रम, राघव भांगडेची कामगिरी

राघवच्या या विक्रमाची नोंद इंडिया बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलीय.  शहरातील नागपूर पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, आंतराष्ट्रीय योगा खेळाडू धनश्री लेकुरवाळे उपस्थित होते.

Nagpur Yoga | वयाच्या सातव्या वर्षी चक्रासनात विक्रम, राघव भांगडेची कामगिरी
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 4:52 PM

नागपूर : येथील राघव भांगडे या 7  वर्षीय चिमुकल्याने चक्रासन करीत एक नवा विक्रम स्थापन केला आहे. राघवने 1 मिनीट 13 सेकंदात चक्रासन करीत 102 पायऱ्या खाली उतरला. दिवसाला चार तास सराव करीत रविवारी राघवने चक्रासनाचा हा विक्रम केला.

पाचव्या माळ्यावरून चक्रासन करत उतरला खाली

योगासनांमध्ये चक्रासन हा प्रकार कठीण मानला जातो. त्यातही चक्रासन अवस्थेत पायऱ्या उतरणे याला मोठे कौशल्य लागते. मात्र नागपूरच्या राघव भांगडे या सात वर्षीय चिमुकल्याने या कठीण योगासनाचा अभ्यास करीत रविवारी विक्रम स्थापन केला. नागपूरच्या बाजीप्रभूनगर येथे राहणाऱ्या राघवने इमारतीच्या पाचव्या माळ्यावरून चक्रासन अवस्थेत तळमजल्यापर्यंत खाली उतरला. 1 मिनीट 13 सेकंदात राघवने 102 पायऱ्या खाली उतरून हा विक्रम केला.

क्रीडामंत्री विक्रमाचे साक्षीदार

राघवच्या या विक्रमाचे साक्षीदार राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यासह आमदार विकास ठाकरे हे देखील झाले. यापूर्वी अशा प्रकारचा कुठलाही विक्रम नव्हता. त्यामुळं राघवचा हा विक्रम नागपूर करांसाठी उत्सुकतेचा विषय होता. राघवच्या या विक्रमाचे साक्षीदार राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यासह आमदार विकास ठाकरे हे देखील झाले.

विजय घीजरे प्रशिक्षक

राघवच्या या विक्रमाची नोंद इंडिया बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलीय.  शहरातील नागपूर पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, आंतराष्ट्रीय योगा खेळाडू धनश्री लेकुरवाळे उपस्थित होते. राघवचे सर्व पाहुण्यांनी सत्कार करून अभिंनदन करण्यात आले. राघवला विजय घीजरे यांनी प्रशिक्षण दिले आहे.

पाच वर्षांचा असताना फोडले होते 125 टाईल्स

सुरुवातीपासूनच राघव हा चंचल असल्याचे राघवचे कुटुंबीय सांगतात. त्याच्या या चंचलपणामुळे त्याला कराटेच्या कोचिंगला टाकले. पाच वर्षाचा असताना एका मिनिटात 125 टाईल्स हाताने फोडण्याचा विक्रमही राघवच्या नावावर आहे. त्यामुळं राघवकडं नागपूरच्या क्रीडाक्षेत्रात आशेचा किरण म्हणून पाहीलं जातंय.

Nagpur IMA | प्रख्यात भुलतज्ज्ञ डॉ. अशोक जाधव यांचे निधन

Nagpur Omicron | विमानानं शारजहावरून आले प्रवासी, मनपानं पाठविलं विलगीकरणात, आमदार निवासात करण्यात आली सोय

Nagpur Crime प्रेमीयुगुलाची गळफास लावून आत्महत्या, भंडारा जिल्ह्यातील परसोडीतील घटना

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.