Nagpur RSS | रेकी प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा, एटीएस, एनआयए करणार; कोण होता रेकी करणारा रईस?

रईस अहमद हा अवंतीपूर जिल्ह्यातील पांपोरचा रहिवासी आहे. तो बारावी नापास असल्याची माहिती आहे. त्याच्या घरची परिस्थिती कमकुवत असून तो इलेक्ट्रिशीयनची कामे करत होता. जैसचा कमांडर उमरने राईसचे ब्रेन वॉशिंग केले.

Nagpur RSS | रेकी प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा, एटीएस, एनआयए करणार; कोण होता रेकी करणारा रईस?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 9:31 AM

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयाची व अन्य स्थळांची दहशतवाद्यांकडून रेकी केली जात होती. रेकी करणारा जैश ए मोहम्मदचा हस्तक रईस अहमद असाद उल्ला शेख (वय 26) याला या प्रकरणी चौकशीसाठी नागपुरात आणले जाणार आहे. रेकी प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा, एटीएस आणि एनआयए संयुक्तपणे करणार आहेत.

रेकी करणारा रईस बारावी नापास

रईस अहमद हा अवंतीपूर जिल्ह्यातील पांपोरचा रहिवासी आहे. तो बारावी नापास असल्याची माहिती आहे. त्याच्या घरची परिस्थिती कमकुवत असून तो इलेक्ट्रिशीयनची कामे करत होता. जैसचा कमांडर उमरने राईसचे ब्रेन वॉशिंग केले. त्यानंतर रईस अहमद हा आधी काश्मीरला आला आणि येथून तो नागपूर शहरात दाखल झाला होता. तो नागपूर शहरात चक्क तीन दिवस होता. त्याने या तीन दिवसात शहरातील संवेदनशील स्थळांची रेकी केली. ही बाब पुढे आल्यानंतर शहर पोलीस सतर्क झाले. जैश ए मोहम्मदचा ऑपरेशन कमांडर उमर याने रईस याला नागपुरात पाठविले होते. यानुसार श्रीनगरवरून मुंबई आणि मुंबईहून नागपूर असा प्रवास करीत इंडिगोच्या विमानाने शहरात पोहोचला. मागील वर्षी 13 जुलै रोजी तो शहरात आला होता. याची साधी कुणकूणही शहर पोलिसांना लागली नव्हती. संघ मुख्यालयात कडक बंदोबस्त असल्यामुळे या ठिकाणी चित्रीकरण करण्यास त्याला जमले नाही. परिणामी, या ठिकाणाहून निघून त्याने रेशीमबाग परिसरातील अवतीभवती असलेले चित्रीकरण केले.

सुरक्षा दलाच्या हाती लागला रईस

15 जुलै रोजी रईस हा काश्मीरमध्ये पोहोचला. श्रीनगर येथील सुरक्षा दलाच्या हाती रईस लागला. त्याने नागपूर शहरात रेकी केल्याचे यावेळी कबूल केले आहे. त्यामुळे तपास पथक श्रीनगरला गेले होते. तेथे या पथकाने रईसची चौकशी केली. त्याला योग्यवेळी नागपुरात चौकशीसाठी आणले जाणार आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक पथक श्रीनगरला गेले होते. तेथे रेकी करणारा रईस अहमदची चौकशी करण्यात आली. हे पथक 27 डिसेंबरला नागपूरला परत आले.

हल्ला कसा परतवायचा याचा सराव

बाँब पेरणे, गोळीबार करणे, स्फोट घडवणे, आत्मघाती हल्ला करणे अशा दहशतवादी हल्ला उधळून लावण्याची आमची तयार आहे. नागपूर पोलीस सतर्क असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. डिसेंबर 2021 मध्ये नागपूर पोलिसांनी केंद्रीय तपास यंत्रणांना रेकीचे इनपूट दिल्यानंतर फोर्स वन आणि एनएसजी कमांडो नागपुरात आले होते. हल्ला कसा परतवून लावायचा याचा सराव केला. ही दोन्ही पथके सात दिवस नागपुरात मुक्कामी होती.

ZP Corona | नागपुरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ अन् कोविड केअर सेंटर बंद; जिल्हा प्रशासन करणार काय?

Transportation | नागपुरात साकारलीय एकाच ठिकाण चारस्तरीय वाहतूक व्यवस्था!; नेमका काय आहे प्रकार?

Nagpur NMC | 500 चौ. फुटापर्यंत मालमत्ता करमाफी झाल्यास कोण उचलेल वाटा?; स्थायी समिती सभापती म्हणतात, राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.