नागपुरात तलाव स्वच्छतेसाठी रिमोट ऑपरेटेड बोट, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या CSR निधीतून मनपाला सहकार्य

| Updated on: Mar 23, 2022 | 1:15 PM

बॅटरी आधारित या बोटद्वारे शहरातील प्रमुख तलावांमधील तरंगता कचरा स्वच्छ करण्याचे महत्वाचे कार्य होणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. (Municipal Commissioner Radhakrishnan B) यांच्या नेतृत्वात शहर स्वच्छतेच्या कार्यात आता तलाव स्वच्छतेचे कार्यही जलद गतीने व सुरळीतरित्या होणार आहे.

नागपुरात तलाव स्वच्छतेसाठी रिमोट ऑपरेटेड बोट, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या CSR निधीतून मनपाला सहकार्य
तलावातील पाणी स्वच्छ करणारी बोट.
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : नागपूर शहरातील फुटाळा, अंबाझरी, सोनेगाव तलावांच्या स्वच्छतेसाठी नागपूर महापालिकेला मोठे सहकार्य मिळाले आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे ( Indian Oil Corporation Limited) सीएसआर निधीतून मनपाला रिमोट ऑपरेटेड बोट (Remote Operated Boat) प्राप्त झालेली आहे. बॅटरी आधारित या बोटद्वारे शहरातील प्रमुख तलावांमधील तरंगता कचरा स्वच्छ करण्याचे महत्वाचे कार्य होणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. (Municipal Commissioner Radhakrishnan B) यांच्या नेतृत्वात शहर स्वच्छतेच्या कार्यात आता तलाव स्वच्छतेचे कार्यही जलद गतीने व सुरळीतरित्या होणार आहे.

एकावेळी 4 ते 5 किमीपर्यंत स्वच्छता

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे नागपूर महापालिकेला 29 लाख रुपये सीएसआर निधीमधून रिमोट ऑपरेटेड बोट देण्यात आली आहे. ही बोट बॅटरीवर आधारित असून, एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर सुमारे 4 ते 5 तास कार्य करते. एका तलावात एकावेळी 4 ते 5 किमीपर्यंत सतत स्वच्छतेचे कार्य करण्याची क्षमता या बोटची आहे. बोटच्या संचालनासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून तांत्रिक व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातील तीन प्रमुख तलावांची स्वच्छता बोटने

शहरातील फुटाळा, अंबाझरी आणि सोनेगाव तीन प्रमुख तलावांची स्वच्छता बोटद्वारे करण्यात येत आहे. प्रत्येक आठवड्यातील दोन दिवस एका तलावाचे स्वच्छता कार्य सुरू आहे. सोमवार व मंगळवारी फुटाळा तलाव, बुधवार व गुरुवारी अंबाझरी तलाव आणि शुक्रवार व शनिवारी सोनेगाव तलावाची स्वच्छता रिमोट ऑपरेटेड बोटद्वारे केली जात आहे. तलावात टाकला जाणारा कचरा पाण्यावर तरंगत असतो. त्यामुळे तलावातील पाणी दूषित होते. शिवाय तलावाचेही प्रदूषण वाढते. रिमोट ऑपरेटेड बोटमुळे तलावात असलेला कचरा काढला जाऊन तलाव स्वच्छ ठेवण्यास मदत होणार आहे.

Amravati | पलंग-गादी पाठवतो आराम करा नि राजीनामा द्या, भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांची नवाब मलिकांवर टीका

Chandrapur | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा, बँकेच्या सीबीआय चौकशीची मागणी, पालकमंत्री वडेट्टीवार-खासदार धानोरकर समोरासमोर

ठाकरे सरकारमध्ये मतभेद आहेत काय?, Sanjay Raut यांनी पहिल्यांदाच दिली कबुली; नेमकं काय म्हणाले?