रस्ता सुरक्षा अभियानाची जनजागृती, नियम माहीत करून घ्या, नागपूर महापालिकेनं काय काय केलं?

| Updated on: Feb 24, 2022 | 8:55 AM

नागपूर मनपाच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती (Road safety life protection campaign) करण्यात आली. पथनाट्यातून वाहतूक नियम समजावून सांगण्यात आले. सिग्नलचे पालन करा, कानाला हेडफोन लावून गाडी चालवू नका आदी नियम सांगण्यात आले.

रस्ता सुरक्षा अभियानाची जनजागृती, नियम माहीत करून घ्या, नागपूर महापालिकेनं काय काय केलं?
नागपुरात पथनाट्यातून वाहतूक नियमांची माहिती देताना युवक.
Follow us on

नागपूर : महानगरपालिकेच्या वतीने सडक सुरक्षा जीवन रक्षा अभियान (Road safety life protection campaign) 2022 अंतर्गत पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. राष्ट्रीय सडक सुरक्षा समितीचे सदस्य चंद्रशेखर मोहिते, संतोष आत्राम यांच्या चमूद्वारे वाहतुकीचे विविध नियम सांगून पथनाट्यामार्फत जनजागृती (public awareness through street plays) करण्यात आली. पथनाट्यातून सिंग्नलचे पालन करा, गाडी चालवितांना मोबाईलवर बोलू नका, ड्रिंक करून गाडी चालवू नका, कानाला हेडफोन लावून गाडी चालवू नका, गाडी चालविताना वाहतुकीच्या नियमांचे (traffic rules) पालन करा असे संदेश देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सडक सुरक्षा समितीचे सदस्य चंद्रशेखर मोहित यांनी सडक सुरक्षेबाबत आपले मत व्यक्त केले.

स्ट्रीट फॉर पीपल

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने बुधवारी महाल येथील टाऊन हॉल समोर स्ट्रीट फॉर पीपल अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात नागरिकांनी बॅडमिंटन, क्रिकेट सारख्या खेळाचे आनंद घेतले. तसेच आर्किटेक्चर यांनी स्केच काढले. महाल भागात अनेक हेरिटेज इमारती आहेत. या इमारतींची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी मागील भागात स्मार्ट सिटीतर्फे विशेष पेंटिंग रस्त्यावर करण्यात आली आहे.

आज हेरिटेज वॉक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त स्मार्ट सिटी तर्फे आयोजित कार्यक्रमात गुरुवारी, 24 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता नागपूर पोलीसच्या वतीने नागरिकांना सायबर गुन्हे संबंधित माहिती देण्यात येईल. तसेच भरोसा सेल आणि मुलांबाबत जनजागृती करण्यात येईल. तसेच दुपारी चार वाजता महापौर दयाशंकर तिवारी, श्रीमंत राजे मुधोजी भोसले आणि स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भूवनेश्वरी एस. महाल भागातील हेरिटेज इमारतींचा पाहणी करतील.

मेडिकलच्या दंत महाविद्यालयात विद्रृप चेहऱ्यांवर होणार उपचार, नागपुरात इम्प्लांट किट्स लवकरच उपलब्ध

सिटी सर्व्हे विभागाची फेरफार अदालत सोमवारी, नागपूर शहरातील नागरिकांची कोणती कामे होणार?

Nagpur | महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यायामशाळेत काढला दम! मनपा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दिले संकेत