Nagpur Crime | नागपूरच्या चकनापुरात दरोडा, चाकूच्या धाकावर मुद्देमाल लुटला; चारपैकी दोन आरोपी अल्पवयीन

कमऱ्यामध्ये ठेवलेल्या लाकडी अलमारीमधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. अंदाजे 3 लाखांची घरफोडी करण्यात आली. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्व कुटुंब बाहेर छप्परीमध्ये झोपले होते.

Nagpur Crime | नागपूरच्या चकनापुरात दरोडा, चाकूच्या धाकावर मुद्देमाल लुटला; चारपैकी दोन आरोपी अल्पवयीन
खापरखेडा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 3:52 PM

नागपूर : जिल्ह्यातील सावनेरमधील (Savner) चनकापूर गावात दरोडा पडला होता. 19 मे रोजी शंकरराव गुढधे (Shankarrao Guddhe) यांच्या फॉर्म हाऊस वर दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. यावेळी दरोडेखोरांनी शंकरराव यांना चाकूच्या धाकावर डोळ्यावर पट्टी बांधून 13 हजार किमतीचा मुद्देमाल लुटला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा विधिसंघर्ष बालक असल्याचं तपासात उघड झालं. विशेष म्हणजे दरोड्यातील 4 आरोपींपैकी 2 आरोपी विधीसंघर्ष आहेत. दोन्ही आरोपींना पोलिसांनी भंडारा जिल्ह्यातील लाखनीमधून ताब्यात घेतलं. तपास सावनेर पोलीस करत आहे. विधीसंघर्ष दोन्ही बालक 15 वर्षाचे असून परिसरात कुख्यात गुंड म्हणून परिचित आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये विधीसंघर्ष बालकांचे प्रमाण वाढत आहे. नियोजित पद्धतीने होणाऱ्या गुन्हेगारीमध्ये मास्टर माईंड (Master Mind) म्हणून हे बालक समोर येताना दिसतात. हा सामाजिक चिंतनाचा विषय आहे.

तीन लाखांची घरफोडी

गोंदिया जिल्हातील आमगाव तालुक्यातील बंजारीटोला येथील डिगंबर यादोवराव सोनवाणे यांचे कुटुंब रात्रीला समोरच्या छप्परीमध्ये झोपले होते. मागच्या दाराची कुंडी तोडून चोरांनी घरात प्रवेश केला. कमऱ्यामध्ये ठेवलेल्या लाकडी अलमारीमधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. अंदाजे 3 लाखांची घरफोडी करण्यात आली. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्व कुटुंब बाहेर छप्परीमध्ये झोपले होते. सकाळी तीन वाजे दरम्यान त्यांचा मुलगा अभ्यास करण्याकरता उठला. घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. अज्ञात चोरट्यांनी समोरच्या छप्परीमध्ये कुटुंब झोपले असल्याचे बघीतले. मागच्या दाराने प्रवेश करीत चोरट्याने घराच्या आतमध्ये प्रवेश केला. अलमारीत असलेले एक लाख 43 हजार 500 रुपये दागिने व 80 हजार रोख रक्कम असा 2 लाख 23 हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केला.

घरचे लोकं उठल्याने चोर पळाले

दुसरी घरफोडी नारायणराव मयाराम रहांगडाले आमच्या घरी फक्त लाकडे संदूक तोडून सामान इकडेतिकडे फेकून पळ काढला. याच गावी दुसरी घरफोडी नारायण रहांगडाले यांच्या घराचे मागच्या दार तोडून घरात असलेल्या लाकडी संदुकातील कुलूप तोडून तेथील ठेवलेला सामान अस्ताव्यस्त केले. वेळीच त्यांच्या घरातील महिलेला जाग आल्यामुळे चोरट्यांनी पळ काढल्यामुळे कोणती चोरी झालेली नाही. यावेळी पोलिसांनी श्‍वान पथक यांना पाचारण करीत चोरीच्या घटनेचा शोध लावण्यास सुरुवात केली आहे. आमगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.