Rohit Pawar | रोहित पवारांची नागपुरात केंद्र सरकारवर टीका; केंद्राकडून महाराष्ट्रापेक्षा गुजरातला जास्त मदत का?

राज्यात वातावरण बिघडू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न होत आहे. भाजप आणि मनसे तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. पण, महाराष्ट्र संतांची भूमी आहे. त्यांचे प्रयत्न हाणून पाडले, असंही रोहित पवार यांनी सांगितलं.

Rohit Pawar | रोहित पवारांची नागपुरात केंद्र सरकारवर टीका; केंद्राकडून महाराष्ट्रापेक्षा गुजरातला जास्त मदत का?
अनिल देशमुख यांच्या घरी भेट दिल्यानंतर उपस्थित रोहित पवार व इतर. Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 3:14 PM

नागपूर : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त काटोलमध्ये (Katol) विविध कार्यक्रमांचे व कोट्यवधी रुपयांचे भूमिपूजन सोहळे आज आयोजित करण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या वाढदिवसानिमित्त हे सर्व कार्यक्रम काटोल तालुक्यात घेण्यात आले. अनिल देशमुख सध्या कैदेत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यावेळी रोहित पवार म्हणाले, मला आनंद वाटतो अनिल देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त येण्याची संधी मिळाली. तुमच्या माध्यमातून मी देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आशा सेविकांनी, आरोग्य सेविकांनी कोरोना काळात खूप चांगले काम केले. कोरोना काळात आरोग्य सेवा चांगली मिळावी, यासाठी अनिल देशमुखांनी काम केलं. रोहित पवार म्हणाले, 20 कोटी रुपयांचे अनिल देशमुख यांनी उपजिल्हा रुग्णालयासाठी (Sub-District Hospital) मंजूर केलं.

28 हजार कोटी केंद्र सरकारकडं

काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात पेट्रोल स्वस्त होतं. सिलिंडरचे भाव वाढले. सिलिंडरवर सबसिडी आम्ही देत होतो. आपल्याच खिशातून जास्त निधी केंद्र सरकारने काढला आहे. 1 लाख कोटी तुमच्या खिशातून काढलेत, अशी टीका रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर केली. गेल्या 10 वर्षात युवकांचे प्रश्न अनेक आहेत. आम्ही जे करतो त्या विरुद्ध केंद्र सरकार करते. 28 हजार कोटी केंद्र सरकारकडं अडकवून आहे. त्यासाठी पाठपुरावा करत आहोत, असंही पवार म्हणाले. सातत्याने महाराष्ट्र राज्याला अडचणीत आणण्याचं काम प्रामाणिकपणे केंद्र सरकार करत आहे. गुजरातमध्ये निवडणूक आहे म्हणून तिथे नुकसान भरपाई दिली. राज्याच्या कोणी अवमान करत असेल तर ते मला सहन होत नाही. विदर्भातील दोन महत्वाच्या संस्था भाजपने एक गुजरातला नेली एक दिल्लीला नेली. विरोधक दोन समाजात तेढ निर्माण करणारी भाषण करतात. दोन गटांतील तरुण आमने-सामने यावीत, असे भाषण करतात.

अनिल देशमुख यांच्या घरी भेट

राज्यात वातावरण बिघडू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न होत आहे. भाजप आणि मनसे तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. पण, महाराष्ट्र संतांची भूमी आहे. त्यांचे प्रयत्न हाणून पाडले, असंही रोहित पवार यांनी सांगितलं. माझ्या मतदारसंघापेक्षा जास्त निधी या मतदारसंघात आणला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आज नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे कर्जत जामखेडचे आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रोहित दादा पवार यांचे अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी स्वागत करण्यात आले. यावेळेस राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे नेते माजी मंत्री रमेशचंद्र बंग, युवा नेते जि. प. सदस्यस लील देशमुख, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, दिनेश बंग, प्रकाश नागपुरे, श्याम मंडपे, शोएबजी असद आदी प्रमुख व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.