Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुळे मोदी आणि योगींची प्रतिमा डागाळली; संघ आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत गुप्त बैठक?

संघ आणि भाजप नेत्यांच्या विचारमंथनात पश्चिम बंगालमधील पराभवाची कारणंही शोधण्याचा प्रयत्न झाला. | RSS BJP

कोरोनामुळे मोदी आणि योगींची प्रतिमा डागाळली; संघ आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत गुप्त बैठक?
पंतप्रधान नरेद्र मोदी
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 9:34 AM

नागपूर: देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारला (Modi govt) अपयश आल्याच्या टीकेची गंभीर दखल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) घेतल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या नेत्यांनी विचारमंथन सुरु केल्याचे सांगितले जाते. यासाठी नुकतीच दिल्लीत संघ आणि भाजपच्या नेत्यांची गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. (RSS and senior bjp leaders meeting in Delhi due to Modi and Yogi Adityanath govt image malign)

या बैठकीला संघाचे नवनियुक्त सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि भाजपच्या वरिष्ठ नेते उपस्थित असल्याचे समजते.उत्तर प्रदेशात गंगेत शेकडो मृतदेह तरंगताना आढळल्यामुळे योगी आदित्यनाथ सरकारची प्रतिमा मलीन झाली होती. तर राष्ट्रीय पातळीवर मोदी सरकारलाही कोरोना हाताळणीतील अपयशावरुन प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे.

यामुळे सरकार आणि पर्यायाने भाजपची प्रतिमा डागाळली आहे. ही प्रतिमा सुधारण्यासाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गंभीरपणे पावले उचलायला सुरुवात केल्याचे समजते. संघ आणि भाजप नेत्यांच्या विचारमंथनात पश्चिम बंगालमधील पराभवाची कारणंही शोधण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी नुकतीच दिल्लीत संघ आणि भाजप नेत्यांची गुप्त बैठक पार पडल्याचे समजते. मात्र, संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी अशी कुठलीही बैठक झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

आम्ही राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात तरंगताना पाहिलाय; संजय राऊतांची भाजपवर जळजळीत टीका

कोरोना हाताळणीतील अपयशावरुन काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जळजळीत शब्दांत टीका केली होती. गंगेत तरंगणाऱ्या प्रेतांना ऑक्सिजन किंवा लस मिळाली नाही. भाजपचे नेते म्हणतात त्याप्रमाणे कोरोना बरे करणारे गोमूत्र तरी त्यांना मिळायला हवे होते. आपण राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात वाहताना आणि तरंगताना पाहिला. यामुळे भारताचा भेसूर चेहरा जगासमोर आला. तरीही भाजपकडून कोरोना असो किंवा चक्रीवादळ प्रत्येक संकटाचे राजकारण सुरुच आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.

संबंधित बातम्या:

कोरोनाविरुद्धच्या लढाईची जबाबदारी गडकरींकडे देण्याची पुन्हा पुन्हा मागणी का? वाचा सविस्तर

‘योगी सरकार बरखास्त करुन उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा’

लसीसाठी तरतूद केलेले 35 हजार कोटी गेले कुठे? राज्यांवर लसींचा बोजा का?

(RSS and senior bjp leaders meeting in Delhi due to Modi and Yogi Adityanath govt image malign)

दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?.
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू.
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल.
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा.
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना.
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य.
"औरंगजेब इथं गाडलाय...", राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेकडून बॅनरबाजी
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट.
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?.
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?.