सर्वात वेगवान, सोयीसुविधांनी सुसज्ज… समृद्धी महामार्गाची भव्यता दर्शवणारे 5 व्हीडिओ…
नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्ग मार्गाचं लोकार्पण...
नागपूर : राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्गाचं (Samruddhi Mahamarg) आज उद्घाटन होतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज लोकार्पण होतंय. 701 कि.मी. लांबीच्या या महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं लोकार्पण पार पडतंय. या महामार्गाची भव्यता दर्शवणारे 5 व्हीडिओ…
समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल…
701 कि.मी. चा महामार्ग
14 जिल्ह्यांना जोडणारा हा 701 कि.मी. लांबीचा समृद्धी महामार्ग जितका अनोखा तितकीच त्याची नागपुरातली सुरुवात देखील जबरदस्त. तब्बल 18 एकर क्षेत्रावर पसरलेल्या चौकातून हा सुसाट, समृद्धी महामार्ग सुरू होतो! 55 हजार कोटी महाकाय बजेट असणारा हा महामार्ग…
समृद्धी महामार्गवर हा राज्यातील सर्वात मोठा चौक आहे. नागपुरात जिथून समृद्धी महामार्ग सुरु होतो, तिथे हा ‘समृद्धीचा माईल झिरो’ चौक प्रवाशांचं या महामार्गावर स्वागतासाठी सज्ज आहे.18 एकर क्षेत्रावर पसरलेल्या हा चौक. 70 हजार 684 चौरस मीटर क्षेत्रफळ या चौकाने व्यापलंय. 36 चौरस मीटरचं लॉन, रंगीबेरंगी झाडं अन् डोळ्यांना दिपवणारी रोषणाई… अशा अनेक वैशिष्ट्यांसह राज्यातील सगळ्यात मोठा चौक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो…
5 डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची पाहणी केली.