सरकारी धान्य खाजगी गोडाऊनमध्ये उतरवत होते, तितक्यात अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी आले अन्…

गेल्या अनेक दिवसापासून नागपुरात सरकारी धान्याचा काळाबाजार सुरु असल्याची माहिती अन्नप्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आज छापा टाकला.

सरकारी धान्य खाजगी गोडाऊनमध्ये उतरवत होते, तितक्यात अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी आले अन्...
नागपुरत सरकारी धान्याचा काळाबाजार उघडImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 8:37 PM

नागपूर / सुनील जाधव : नागपूरमध्ये रेशन घोटाळा उघडकीस आला आहे. रेशनच्या धान्याचा काळाबाजार उघड झाला आहे. रेशनमध्ये गरिबांना दिलं जाणारं धान्य परवानगी नसलेल्या एका खाजगी गोडाऊनमध्ये उतरवण्यात येत होते. तितक्यात अन्नपुरवठा विभागाचे अधिकारी तेथे हजर झाले आणि त्यांनी घोटाळेबाजांना रंगेहाथ पकडले. पन्नास क्विंटल धान्य खाजगी गोडाऊनमध्ये उतरविण्यात आलं होतं. हे धान्य कुठून आलं आणि कोणाला विकलं जाणार होता याचा तपास सुरू आहे. यामागे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी सखोल तपास सुरु आहे.

गेल्या काही दिवसापासून सुरु होता धान्याचा काळाबाजार

गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात रेशनच्या सरकारी धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याची माहिती अन्नप्रशासन विभागाला मिळाली होती. तसेच ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अन्न प्रशासन विभागाला या संदर्भात माहिती दिली होती. मात्र आरोपी हाती लागत नव्हते.

गुप्त माहितीच्या आधारे अन्नपुरवठा विभागाने छापा टाकला

गड्डीगोदाम परिसरातील एका गोडाऊनमध्ये सरकारी धान्य उतरविले जात असल्याची गुप्त माहिती आज अन्न वितरण विभागाला मिळाली होती. सदर गोडाऊन खाजगी आहे. तिथे कुठलाही बोर्ड नाही. यावरून अन्न वितरण विभागाने त्या ठिकाणी पोहोचत कारवाई केली असता त्या गोडाऊनमध्ये जवळपास 50 क्विंटल धान्य आढळून आले. ते धान्य सरकारी स्टॅम्प लागलेले आहे. सोबतच ट्रक चालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी आणखी पंधरा क्विंटल धान्य पोहोचवलं जाणार होतं. त्यावरून ही कारवाई करण्यात आली असून, पुढील कारवाई आता अन्नप्रशासन विभाग करत आहे.

हे सुद्धा वाचा

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.