Nagpur Education | खेळीमेळीच्या वातावरणातून वैज्ञानिक प्रयोग शिकता येणार; नागपुरात अद्ययावत स्टेम लॅबची निर्मिती
मनपाच्या शाळेतील शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नागपूर महापालिका सतत प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात प्रयोगातून विज्ञान शिकता यावे यासाठी अद्ययावत स्टेम लॅबची निर्मिती करण्यात आलेली आहे.
नागपूर : विज्ञानातील रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणितातील घटक विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने प्रयोगाच्या माध्यमातून शिकता यावे हा मागचा उद्देश आहे. यासाठी मनपातर्फे साकारण्यात आलेली अद्ययावत स्टेम लॅबची (Updated stem lab) निर्मिती करण्यात आली आहे. पॉथ फाइंडर संस्था (Pathfinder Institution) पुढील तीन वर्ष विज्ञान विषयाच्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मागर्दर्शन करणार आहे. लॅबमधील प्रयोग कसे करावे, उपकरणांचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल सर्व माहिती संस्थे वतीने शिक्षकांना देण्यात येणार आहे. यामध्ये दोनशे पेक्षा अधिक प्रयोग (More than two hundred experiments) करता येणार आहे. यामधून पाठ्यक्रमातील प्रत्येक घटक समजून घेता येणार आहे. अशा पद्धतीने स्टेम लॅबचे नियोजन करण्यात आले आहे. आधुनिक भारतात अत्याधुनिक शिक्षण देण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.
प्रयोगांविषयी मार्गदर्शन करणार
अद्ययावत स्टेम लॅबच्या माध्यमातून मनपाचे विद्यार्थी प्रत्येक विषय प्रयोगाच्या माध्यमातून शिकू शकणार आहेत. यामुळे विद्यार्थी नैसर्गिक पद्धतीने आपल्या बुद्धीला विकसित करून खेळातून विज्ञानाला आत्मसात करू शकणार आहेत, असे महापौर यावेळी म्हणाले. सोमवारी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते एम.ए.के. आझाद उर्दू माध्य. शाळा आणि जी.एम बनातवाला इंग्रजी माध्य. शाळेतील अद्ययावत स्टेम लॅबचे उदघाटन करण्यात आले. आमदार प्रवीण दटके यांच्या निधीतून हे लॅब उभारण्यात आले. यावेळी पॉथ फाइंडर संस्थेचे प्रमुख धनंजय बालपांडे यांनी प्रयोगशाळेविषयी आणि विविध प्रयोगांविषयी महापौरांना माहिती दिली. काही प्रात्यक्षिकही करून दाखविले. तसेच पुढील तीन वर्षे पॉथ फाइंडर संस्था लॅब निर्मित शाळेतील विज्ञान विषयाच्या शिक्षकांना स्टेम लॅब मधील विविध प्रयोगांविषयी मार्गदर्शन करणार आहे. या तीन वर्षाच्या काळात शिक्षक पारंगत होऊन विद्यार्थ्यांना प्रत्येक घटक सहजरित्या समजावून सांगू शकतील.
लॅब तयार करण्यात आलेल्या शाळा
लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी माध्यमिक शाळा एम.ए.के. आझाद उर्दू माध्यमिक शाळा दुर्गानगर मराठी माध्यमिक शाळा जी.एम. बनातवाला इंग्रजी माध्यमिक शाळा राममनोहर लोहिया हिंदी माध्यमिक शाळा संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा