Nagpur Crime : तुम्ही खरेदी करत असलेले ब्राडेड साहित्य डुप्लिकेट तर नाही?

कंपनीच्या वस्तू खरेदी करताना सावध होण्याची वेळ आली आहे. कारण डुप्लिकेट वस्तू बाजारात आणून त्या कमी किमतीत दिल्या जातात.

Nagpur Crime : तुम्ही खरेदी करत असलेले ब्राडेड साहित्य डुप्लिकेट तर नाही?
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 8:16 PM

नागपूर, 30  ऑगस्ट 2023 : नागपूरच्या (Nagpur Crime) सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीत इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोबाईल आणि मोबाईल पार्टची विक्री आणि खरेदी होत असते. या बाजारात मोठ्या प्रमाणात अॅप्पल कंपनीचे इयर बर्ड आणि इतर साहित्य बनावट (Duplicate) विकले जात असल्याच्या तक्रारी एप्पल कंपनीकडे आल्या. त्यावरून अॅप्पल कंपनीने याची माहिती पोलिसांना दिली. अॅप्पल कंपनीचे प्रतिनिधी आणि पोलिसांनी सीताबर्डीतील इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये (Electronic Market in Sitabardi) धाड टाकली. चार दुकानांमध्ये तपासणी केली. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इअर बर्ड आणि इतर साहित्य बनावट असलेले अॅप्पलच्या नावाने विकल्या जात होते. त्यावरून पोलिसांनी कारवाई करत 87 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तर चार आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक सुद्धा करण्यात आली. अशी माहिती सीताबर्डीचे पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी दिली.

इलेक्ट्रिक मार्केटमध्ये धाड

अॅप्पल कंपनीचे साहित्य ब्रान्डेड असते. त्यामुळे त्याची किंमतीही जास्त असते. डुप्लिकेट अॅप्पल कंपनीचे साहित्य तयार करून ते विकले जात होते. ही बाब लक्षात आली. ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या. त्यानंतर अॅप्पल कंपनीने पोलिंसात तक्रार केली. पोलिसांच्या मदतीने इलेक्ट्रिक मार्केटमध्ये धाड टाकली तेव्हा हा प्रकार समोर आला.

हे सुद्धा वाचा

बऱ्याच लोकांची फसवणूक

अॅप्पलच्या नावाने डुप्लिकेट माल कुठून येत होता. याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे. कमी किमतीत वस्तू मिळत असल्याने ग्राहक खरेदी करत होते. पण, त्याची गुणवत्ता अॅप्पलसारखी नसल्याने ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. आतापर्यंत अशा प्रकरणात बऱ्याच लोकांची फसवणूक झाल्याची माहिती आहे.

सावध होण्याची वेळ

कंपनीच्या वस्तू खरेदी करताना सावध होण्याची वेळ आली आहे. कारण डुप्लिकेट वस्तू बाजारात आणून त्या कमी किमतीत दिल्या जातात. ग्राहकांना वाटते आपल्याला कमी किमतीत वस्तू मिळते. म्हणून ते खरेदी करतात. पण, अशावेळी त्यांची फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.