नागपुरात मानवी कवटी आढळल्याने खळबळ, विधवा महिला पाच महिन्यांपासून बेपत्ता, ही कवटी नेमकी कुणाची? 

नागपूर जिल्ह्यातील कोलारीजवळ मानवी कवठी (Kavathi in Nala near Kolari) सापडली. यापूर्वी चार दिवसांआधी याच भागात महिलेची साडी आणि पेटीकोट आढळले. पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या महिलेची तर कवठी नाही ना, या दिशेने पोलीस तपासाला लागले आहेत.

नागपुरात मानवी कवटी आढळल्याने खळबळ, विधवा महिला पाच महिन्यांपासून बेपत्ता, ही कवटी नेमकी कुणाची? 
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 8:30 PM

नागपूर : भिवापूर तालुक्यातील कोलारी येथील शेतकरी भालचंद्र धनविजे शेतावर जात होते. पंढरी वैरागडे यांच्या शेताजवळून नाला वाहतो. या नाल्याच्या काठावर त्यांना मानवी कवटी (Kavathi in Nala near Kolari) दिसली. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. ठाणेदार महेश भोरटेकर, सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चंगोले, गणेश भुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनाम्यानंतर कवटी ताब्यात घेण्यात आळी. कवठी फॉरेन्सिक चाचणीकरिता ( Forensic Test) नागपूरला पाठविण्यात आली. चार-पाच दिवसांपूर्वी चाय परिसरात महिलेची साडी ((Women’s Saree) ) व पेटीकोट आढळला होता. या कपड्यांच्या बाजूला जनावराचे मुंडके व हाडं पडलेली होती.

विधवा महिला पाच महिन्यांपासून बेपत्ता

कोलारी येथील प्रमिला मारोती धनविजे ही विधवा महिला गेल्या पाच महिन्यांपासून बेपत्ता आहे. तिचा भाऊ रवींद्र शेंडे याने यासंदर्भात भिवापूर पोलिसांत तक्रार दिली. तेव्हापासून पोलीस प्रमिलाचा शोध घेत आहेत. या महिलेला दोन मुली आहेत. एक सहाव्या, तर दुसरी नवव्या वर्गात शिक्षण घेत आहेत. त्यामुळं ही कवठी याच महिलेची असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हत्या की, आत्महत्या?

या बत्तीस वर्षीय महिलेचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. ती त्याच्यासोबत लग्नही करणार होती. पण, अचानक बेपत्ता झाली. त्यामुळं या महिलेची कुणीतही हत्या केली असावी, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. कदाचित तिने आत्महत्या केली असावी, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार महेश भोरटेकर, सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

नागपूर कारागृहातील झडतीत गुंडाकडे सापडल्या होत्या तार, टॅबलेट्स; जेलरने खरटपट्टी काढल्याने चिडून केला हल्ला

उद्योजक होण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी सुवर्णसंधी, नागपुरात केव्हापर्यंत करता येणार अर्ज

पर्यटनाला केव्हा येणार चांगले दिवस?, नागपुरातील पर्यटकांचे जंगल सफारीला प्राधान्य

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.