Nagpur Crime | सामूहिक बलात्काराच्या घटनेने नागपुरात खळबळ; फेसबूकवरून मैत्री झाली, युवकाने फ्लॅटवर बोलावले आणि…

दुसर्‍या दिवशीसुद्धा तिला जाफरनगर भागात घेऊन जाऊन सामूहिक अत्याचार करण्यात आला. अत्याचार करण्यापूर्वी आरोपींनी दारूची पार्टी केल्याची माहिती आहे. तिच्यावर दुसर्‍यांदा सामूहिक अत्याचार झाल्यानंतर ती घरी गेली.

Nagpur Crime | सामूहिक बलात्काराच्या घटनेने नागपुरात खळबळ; फेसबूकवरून मैत्री झाली, युवकाने फ्लॅटवर बोलावले आणि...
अंबाझरी पोलीस ठाणे
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 9:09 AM

नागपूर : पीडित तरुणी ही अंबाझरी पोलीस ठाण्याच्या (Ambazari Police Station) हद्दीत राहते. काही दिवसांपूर्वी तिची एक मित्राशी फेसबूकवरून ओळख झाली. दोन फेब्रुवारी रोजी कॅम्पस चौकातून त्या मित्राने आपल्या दुचाकीवर युवतीला बसवले. तिला जाफरनगर ले-आऊट (Jafarnagar layout) भागातील एका फ्लटमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. बलात्कार करण्यापूर्वी तिला गुंगीचे औषध (Numb medicine) दिले होते. काही वेळाने दुसरा त्याचा एक मित्र आला. त्यानंतर चार-पाच जण तिथं आले. त्यांनी तिच्यावर बळजबरी केली. त्यामुळं युवती प्रचंड घाबरली होती. त्यानंतर तरुणीला सीताबर्डी भागात सोडून दिले. दुसर्‍या दिवशीसुद्धा तिला जाफरनगर भागात घेऊन जाऊन सामूहिक अत्याचार करण्यात आला. अत्याचार करण्यापूर्वी आरोपींनी दारूची पार्टी केल्याची माहिती आहे. तिच्यावर दुसर्‍यांदा सामूहिक अत्याचार झाल्यानंतर ती घरी गेली.

पोटात दुखायला लागल्यानंतर तक्रार

घरी गेल्यानंतर तिच्या पोटात दुखायला लागले. कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. तपासानंतर तिच्यावर बळजबरी करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. पीडितेने गुरुवारी सायंकाळी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सामूहिक अत्याचाराची माहिती मिळताच डीसीपी विनिता साहू याही ठाण्यात पोहचल्या. पीडितेकडून घटनेची माहिती घेतली. तिने दिलेल्या माहितीनुसार, दोन मुले जाफरनगर तर दोन मुले बजेरिया येथील रहिवासी आहेत. गुन्हे शाखा आणि पोलिसांचा डीबी स्वॅड आरोपींच्या शोधासाठी कामाला लागले आहे.

आरोपींना अटक करण्याचे पोलिसांसमोर आव्हान

यापूर्वी वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अठ्ठावन्न वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना काल उघडकीस आली. पीडित महिला घरी एकटी असताना दोन जण पाणी मागण्याच्या बहाण्याचे तिच्या घरी शिरले. त्यानंतर पीडितेसोबत बळजबरी केली. त्या आरोपींचा शोध लागत नाही. तोच दुसरी घटना उघडकीस आली आहे. या पीडित युवतीले आधी अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. चार-पाचही आरोपी पसार झालेत. त्यामुळं पोलिसांसमोर आरोपींना अटक करण्याचे आव्हान आहे.

Nagpur NMC | मनपाच्या स्थायी समितीकडून यंदाही करवाढ नाही, प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहाकडे पाठविला

Nagpur Crime | एकटी पाहून मध्यरात्री घरात घुसले; चाकूच्या धाकावर 58 वर्षीय महिलेवर दोघांकडून बलात्कार, नागपुरात चाललंय काय?

Wardha | कर्जबाजारी झाल्यानं नवरा-बायको दोघांनीही विष घेतलं!, उपचारादरम्यान नवरा दगावला, पण पत्नी वाचली

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.