सासूसोबत जोरदार भांडण, रागाच्या भरात सात महिन्याच्या बाळाला जबर मारहाण, नागपूरमध्ये खळबळ

नागपूरमध्ये आपल्या सात महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला एका आईने जबर मारहाण केली आहे. (nagpur seven month child beaten by mother)

सासूसोबत जोरदार भांडण, रागाच्या भरात सात महिन्याच्या बाळाला जबर मारहाण, नागपूरमध्ये खळबळ
NAGPUR MOTHER BEATEN CHILD
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 7:33 PM

नागपूर : असं म्हणतात की आई ही आपल्या मुलांसाठी जीवाचं रान करते. तिच्या मायेला सीमा नसल्याचे सांगितले जाते. मात्र, नागपुरात एक विचित्र प्रकार घडला आहे. आपल्या सात महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला एका आईने रागाच्या भरात जबर मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वांचा थरकाप उडालाय. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. नागपूर पोलिसांनीसुद्धा या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Seven month child beaten by mother in Nagpur Police registered case)

महिलेचे सासूबरोबर जोरदार भांडण

मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील अंबाझरी परिसरातील ही घटना आहे. किरण मसराम असं लहान बाळाला मारहाण करणाऱ्या माहिलेचं नाव आहे. व्हिडीओमध्ये ही महिला आपल्या सासूसोबत घरगुती वादातून भांडत करताना दिसतेय. यावेळी राग अनावर झाल्यामुळे ही महिला आपल्या पोटच्या सात महिन्यांचा बाळाला चक्क मारहाण करते आहे. तसं व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतंय.

पोलिसांकडून गंभीर दखल, गुन्हा दाखल

ही घटना समाजमाध्यमावर येताच त्याची गंभीर दखल नागपूर पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी महिलेकडे जाऊन सर्वात आधी बाळाला ताब्यात घेऊन सुरक्षित केलंय. त्यानंतर पोलीस आणि एनजीओच्या मदतीने या महिलेचं काऊन्सलिंग करण्यात आलंय. दरम्यान, या प्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

कल्याणमध्ये वॉचमनला अमानुषपणे मारहाण

सोसायटीचा गेट उघडण्यास उशीर झाला या कारणावरुन एका तरुणाने वॉचमनला बुलेटच्या चैनने बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये 29 मे रोजी घडली होती. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी स्टॅली जॉर्ज नावाच्या या तरुणावर कारवाई केली आहे. मात्र, आरोपीने अशाप्रकारे निर्दयी वागणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून देण्यात आली. तसेच ही घटना घडल्यानंतर सोसायटीतील नागरिकांची देखील तशीच भावना होती.

इतर बातम्या :

प्रेमात विकृती ! महिलेचा वारंवार लग्नाचा हट्ट, प्रियकराचं संतापजनक कृत्य

अल्पवयीन तरुणाची आत्महत्या, कुटुंबियांनी मृतदेहासोबत प्रेयसीचं लगीन लावलं

मोबाईलवर खेळू नकोस, बाबा ओरडल्याचा राग, मुलाकडून बँक अधिकारी वडिलांची कुऱ्हाडीने हत्या

(Seven month child beaten by mother in Nagpur Police registered case)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.