Video – नागपुरातल्या दहेगावात बैलांचा शंकरपट, आमदार टेकचंद सावरकर यांनी हाकलला शेकडा
बैलांच्या शंकरपटांचे आयोजन करण्यात येतंय. यात राजकीय नेतेही हिरीरीने भाग घेताना दिसतात. भंडाऱ्यात खासदार सुनील मेंढे हे शेकड्यावर बसून कातकर झाले होते. आता आमदार टेकचंद सावरकर यांनीही हातात बैलांचा कासरा धरला.
नागपूर : जिल्ह्यात शंकरपटाला सुरुवात झाली आहे. आमदार टेकचंद सावरकर यांनी शनिवारी बैलजोडी हाकलली. स्वतः बैलजोडी हाकत आमदार सावरकर यांनी शंकरपटाचे उद्घाटन केले. मौदा तालुक्यातील दहेगाव धानला येथे शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं. शंकरपट पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. ग्रामीण भागातील अत्यंत हर्षोल्लासाने साजरा करण्यात येणारा सण म्हणजे बैलांचा शंकरपट. शासनाने बैलाच्या शंकरपटास परवानगी दिल्यानंतर कित्तके वर्षापासून बंद असलेला शंकरपट सुरू करण्यात आला. मौदा तालुक्यातील दहेगाव (धानला) (Dahegaon (Dhanla)) येथे तीन दिवशीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले. या शंकरपटाचे उद्घाटन कामठी-मौदा विधानसभा (Kamathi Mauda Assembly) क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर (Tekchand Savarkar) यांच्या हस्ते करण्यात आले.
पाहा व्हिडीओ
आमदार टेकचंद सावरकर शंकरपटात शेकडा हाकताना. pic.twitter.com/7LLH7vl5ZZ
— Govind Hatwar (@GovindHatwar) March 20, 2022
पटाच्या दाणीवर उतरून धरला कासरा
मूळचे शेतकरी परिवारातील असलेले आमदार सावरकर यांनाही यावेळी शंकरपटामध्ये बैलजोडी जुंपून शर्यतीमध्ये सहभागी होण्याचा मोह आवरला नाही. सावरकरांनीही यावेळी स्वत: जोडी जुंपून शंकरपटाचे उद्घाटन केले. शंकरपटाचा आनंद घेतला. यावेळी सावरकर यांनी न्यायालयाने शंकरपटाला मंजुरी दिल्याबद्दल न्यायालयाचे आभार मानले. या निर्णायामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. शंकरपटाला मोठ्या संख्येने नागरिक हजेरी लावत आहेत.
आमदार टेकचंद सावरकर यांनी फेसबूकवर टाकलेली पोस्ट
अकोल्यात आज शंकरपटाचा समारोप
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कुटासा दहीहंडा रोडवर दोन दिवसीय राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत व शंकर पटाचे आयोजन करण्यात आले. या बैलगाडी शर्यतीत हिंगोली यवतमाळ औरंगाबाद सह मध्य प्रदेशमधून बैलगाडा शर्यतीत सहभागी होण्यासाठी बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला आहे. आज शंकरपटाचा समारोप राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सुरू असलेल्या शंकरपट यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.