VIDEO: नागपुरात जमावबंदी असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी?; रविकांत तुपकर यांचा सवाल

शहरात जमावबंदी लागू असल्याने आमच्या आंदोलनाला परवानगी नाकारली जाते. मग जमावबंदी आदेश लागू असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी दिली?

VIDEO: नागपुरात जमावबंदी असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी?; रविकांत तुपकर यांचा सवाल
ravikant tupkar
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 11:58 AM

नागपूर: शहरात जमावबंदी लागू असल्याने आमच्या आंदोलनाला परवानगी नाकारली जाते. मग जमावबंदी आदेश लागू असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी दिली? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.

रविकांत तुपकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. नागपूर शहरात कलम 144 लागू असतानाही शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी? असा सवाल करत रविकांत तुपकर यांनी थेट पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केला आहे.

अन्न त्याग आंदोलन सुरू

तुपकर यांचं नागपुरात ‘बेमुदत अन्नत्याग आंदोलन’ सुरु झालं आहे. कापसाला 12000 रुपये भाव मिळावा, आणि सोयाबीनला 8 हजार रुपये क्विंटल भाव मिळावा, या मागणीसाठी तुपकर संविधान चौकात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. नागपुरात जमावबंदीचे आदेश असल्यानं तुपकर यांनी आंदोलन करू नये यासाठी पोलिसांनी नोटीस बजावलीय. मग नागपूरात कलम 144 लागू असतानाही शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी? पोलीसांचा सर्वांना समान न्याय का नाही? असा सवाल तुपकर यांनी उपस्थित केला आहे.

मराठवाडा, विदर्भात ठिय्या आंदोलन

दरम्यान, 18 नोव्हेंबर रोजी मराठावाडा आणि विदर्भातील प्रत्येक गावात प्रभात फेरी, धरणे आणि ठिय्या आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच 19 नोव्हेंबर रोजी मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रास्तारोको करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

कंगना आणि गोखलेंच्या डोक्यावर परिणाम

दरम्यान, या आधी तुपकर यांनी अभिनेत्री कंगना रणावत आणि विक्रम गोखले यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागमी केली आहे. कंगना रणावतने भारतीय स्वातंत्र्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे अभिनेता विक्रम गोखले यांनी समर्थन केले आहे. त्यामुळे या दोघांवरही देशद्रोहाचा खटला दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली. या दोघांच्याही डोक्यावर परिणाम झालाय. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज आहे, असा सल्लाही त्यांनी दिला. कंगनाच्या वक्तव्याप्रमाणे 2014 ला जर स्वातंत्र्य मिळाले असेल तर भविष्यात मोदी सरकार आले नाही तर आपण पुन्हा पारतंत्र्यात जाणार आहोत का? असा सवालही त्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या:

मारहाण, कौटुंबिक हिंसाचार, अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात पत्नी स्नेहाने दाखल केला गुन्हा

VIDEO: वेडे लोक बरळत असतात, ते कोणत्या नशेत बरळतात याचा एनसीबीने तपास करावा; राऊतांचा कंगनाला टोला

शाळा, बांधकामे, सर्व ट्रक्स बंदी; CAQM ने जाहीर केली निर्बंधांची यादी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.