“फक्त आरक्षण नको तर आपण उद्योजकही झालं पाहिजे”; शरद पवार यांच्या वक्तव्याचा अर्थ काँग्रेसच्या नेत्यांनीच सांगितला
काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी बोलताना सांगितले की, शरद पवार यांनी आरक्षण विरोधी कोणतंही वक्तव्य केलं नाही.
नागपूरः पुण्यातील संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षण नको, उद्योगाकडे वळा असं वक्तव्य केलं होते. आधी अर्थकारणाकडे जाण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिल्यानंतर त्या गोष्टीवरून मराठा क्रांती मोर्चाकडून आक्षेप घेतला जात आहे. त्यावरून आता वादंग माजला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षणाला कोणताही विरोध केला नाही.
शरद पवार यांनी आरक्षणाविषयी बोलताना सांगितले की, आरक्षण नको तर आधी अर्थकारणाकडे वळले पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
त्यावर आता मराठा आरक्षण मोर्चाने आक्षेप घेत त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. त्यावर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून त्याचा विपर्यास करत असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.
काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी बोलताना सांगितले की, शरद पवार यांनी आरक्षण विरोधी कोणतंही वक्तव्य केलं नाही.
त्यांनी सांगितले की, मराठी समाजातील तरुणांनी आधी अर्थकारणाकडे वळावे. आरक्षणाची जी प्रक्रिया आहे ती त्या नुसार मिळेलच मात्र त्याआधी उद्योजक म्हणून अर्थकारणाकडे वळणे गरजेचे असल्याचे मत शरद पवार यांनी सांगितले असल्याचे आमदार यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
आमदार यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांची बाजू मांडताना सांगितले आरक्षणाविरोधात ते बोलले नाहीत तर आपण म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांनी उद्योगाकडे गेले पाहिजे.
एका कुटुंबामध्ये तीन लेकरं असतील त्यामधील दोघांनी आधी उद्योगाकडे वळावे असंही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे शरद पवार यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून त्याचा चुकीचा अर्थ काढू नये असं आवाहनही यशोमती ठाकूर यांनी केले आहे.