Chandrasekhar Bavankule | माझ्या घरासमोर शिवसैनिकांनी या, हनुमान चालिसाचं पठण करा; बावनकुळेंचं थेट शिवसैनिकांना आवतन

| Updated on: Apr 24, 2022 | 12:53 PM

आजपासून भाजप कंदील आंदोलन करणार आहे. पुढील काळात मंत्र्यांच्या घरी कंदील सप्रेम भेट पाठवू. सरकार यावर मानलं नाही तर शेतकऱ्यांचे आंदोलन होईल. त्यात भाजप सहभागी होईल, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

Chandrasekhar Bavankule | माझ्या घरासमोर शिवसैनिकांनी या, हनुमान चालिसाचं पठण करा; बावनकुळेंचं थेट शिवसैनिकांना आवतन
भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : नागपूर : भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) म्हणाले, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी (activists) माझ्या घरासमोर येऊन हनुमान चालीसा पठण करावं. मी त्यांचं स्वागत करेन. त्यांची व्यवस्था करणार. पेंडॉल टाकून बसण्याची व्यवस्था करत लाडूचा प्रसादसुद्धा देणार. भाजपच्या नेत्याच्या घरासमोर जर कोणी हनुमान चालीसा म्हणणार म्हटलं असत तर आम्ही त्यांची व्यवस्था केली असती. त्यांना जेवण प्रसाद आणि पूजापाठची व्यवस्था केली असती. हे सरकार इंग्रजांसारखं वागत आहे. झेड सुरक्षा असलेल्या व्यक्तीवर हल्ला होत आहे. त्याला पोलिसांनाच सपोर्ट आहे. राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने विकास केला नाही. यापासून सरकारला लक्ष डायव्हर्ट करायचं आहे म्हणून हे सगळं होत आहे. राज्यात अराजकता निर्माण केली जात आहे. या सरकारला कोणालाही समजावून घ्यायचं नाही. फक्त अराजकता माजवायची आहे. राष्ट्रपती शासनाची मागणी आम्ही करत नाही. मात्र सगळ्या राज्यात वेगवेगळ्या घटना घडत आहेत.

राज्यात अघोषित भारनियमन

राज्यात दीड हजार मेगावॅटच्यावर अघोषित भारनियमन होत आहे. सरकार दावा करते अघोषित भारनियमन होत नाही, गडचिरोलीपासून कोल्हापूरपर्यंत शेतकऱ्यांना फक्त 2 तास वीज मिळते आहे. परवापर्यंत अडीच हजार मेगा वॅट भारनियमय होत होतं. केंद्र सरकारने 5 हजार मेगावॅट पेक्षा जास्त वीज दिली. मागच्या सरकारपेक्षा जास्त वीज दिली. कोळसा दिला. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये नियोजन केले नाही, जो कोळसा पावसाळ्यात कामी आला असता, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

भाजप कंदील आंदोलन करणार

राज्य सरकार स्वतःचं पाप केंद्र सरकारवर टाकत आहे. राज्यात वीज दरवाढ केली. जानेवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. अनामत रक्कम घेतली जात आहे. वीज बाहेर घेऊन त्यात भ्रष्टाचार करणे हा सुद्धा उद्देश असू शकतो, अशी शंका बावनकुळे यांनी व्यक्त केली. आजपासून भाजप कंदील आंदोलन करणार आहे. पुढील काळात मंत्र्यांच्या घरी कंदील सप्रेम भेट पाठवू. सरकार यावर मानलं नाही तर शेतकऱ्यांचे आंदोलन होईल. त्यात भाजप सहभागी होईल, असंही बावनकुळे यांनी सांगितलं.

Bhandara | शिक्षकांचे पगार काढण्यासाठी मुख्याध्यापकाने दीड हजार रुपये मागितले; भंडाऱ्यातील उसऱ्याच्या मुख्याध्यापकाला अटक

Video Amravati Fire | कांडलीतील सिलिंडर गोदामाला भीषण आग; दोन किलोमीटरपर्यंत सिलिंडरच्या स्फोटाचा आवाज

Video Raosaheb Danve | राणा आणि सोमय्यांवरील हल्ल्याचा राडा! दानवे म्हणतात, कुणाच्याही घरावर जाणं ठीक नाही, पण…