Video – शिवसेनेचे आमदार म्हणतात, आत्मचिंतन करण्याची गरज; विदर्भात पक्षाला का मिळालं नाही योग्य स्थान?
राज्यात शिवसेनेचं सरकार आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. असं असताना विदर्भात मात्र पक्ष चौथ्या स्थानावर घसरला. यामागचे कारण काय याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असं पक्षाचेच आमदार सांगतात.
नागपूर : राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना विदर्भातील अनेक नगरपंचायतीत शिवसेनेचं पानीपत झालंय. विदर्भात शिवसेना चौथ्या क्रमांकावर गेलाय. विदर्भात काल आलेल्या निकालात नगरपंचायतीच्या 494 जागांपैकी 48 जागा शिवसेनेला मिळाल्यात. विदर्भात शिवसेना पक्षाला योग्य ते स्थान मिळालं नाही. निवडणूक कोणतीही असो. शिवसेनेला फारसे काही मिळत नाही. लोकसभेत रामटेकचे खासदार शिवसेनेचे आहेत. पण, विधानसभेतंही शिवसेनेला फारसे काही मिळत नाही. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे उमेदवार निवडूण येत नाही. नगर परिषदेतंही निकाल येत नाही. पक्षाने याची योग्य ती काळजी घ्यावी, ती काळजी घेतल्याशिवाय चांगले निकाल येणार नाही, यावर पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा घरचा आहेर राज्यमंत्री दर्जा असलेले शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी दिलाय.
हिंगण्यात भाजपचा विजय, तर कुहीत काँग्रेसची सत्ता
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने दमदार विजय मिळविला. तर कुही नगरपंचायतीत अपक्ष उमेदवाराच्या बळावर काँग्रेसचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे. कुही नगरपंचायतची निवडणूक ओबीसी आरक्षणामुळे चार प्रभागाला स्थगिती देऊन मागील बुधवारी तहसील कार्यालयात सर्व प्रभागांची मतमोजणी करण्यात आली. पाच फेर्या करून 17 प्रभागातील मतमोजणी करण्यात आली. हिंगणा नगरपंचायत समितीत एकूण 17 उमेदवार निवडूण आले. त्यामध्ये भाजपा – 9 राष्ट्रवादी कॉंग्रेस – 5, शिवसेना – 1, अपक्ष – 2 अशी स्थिती आहे. कुही नगरपंचायतीत एकूण 17 उमेदवार निवडूण आले. कॉंग्रेस – 8, राष्ट्रवादी – 4, भाजपा – 4, अपक्ष – 1 असे उमेदवारांचा समावेश आहे.
हे उमेदवार आलेत निवडूण
जयश्री धांडे (राष्ट्रवादी), निखिल येळणे (भाजप), विद्या लेंडे (अपक्ष), शीतल येळणे (काँग्रेस), रुपेश मेश्राम (काँग्रेस), मयूर तळेकर (काँग्रेस), वैशाली सोमनाथे (राष्ट्रवादी), विनोद हरडे (राष्ट्रवादी), निशा घुमरे (काँग्रेस), सरीन शंभरकर- (काँग्रेस), अमित ठवकर- (काँग्रेस), नेहा मनसारे (भाजप), हर्षा इंदोरकर (काँग्रेस), वर्षा धनजोडे (भाजप), नरेंद्र झुरमुरे (भाजप), सुषमा देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस), शारदा दुधपचारे- (काँग्रेस) हे उमेदवार निवडून आलेत.