Nagpur | कौटुंबिक समुपदेशन का गरजेचे, शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांनी सांगितले कारण
मुलांना मोफत शिक्षण देऊ नका. पण काही सवलती द्या. पुण्यात पालकांना मारहाणीचा प्रकार बघीतला. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी अशाप्रकारची दंडेलशाही योग्य नाही. पालकांनी एका मुलाची फी माफ करा असे वाद घालायला लागले तर सर्वच पालक वाद घालतील, असंही निलम गोऱ्हे म्हणाल्या.
नागपूर : नागपुरातील डबल मर्डरची (Nagpur double murder) धक्कादायक घटना आज उघडकीस आली. नागपुरात महिला अत्याचाराच्या दोन, तीन घटना घडल्यात. नागपुरात कुटुंब कलहातून (family feud) पत्नी आणि मुलीला मारुन स्वतः आत्महत्या केलीय. त्यामुळे कौटुंबिक समुपदेशन गरजेचं आहे. याबाबत 52 नंबरचं विधेयक या अधिवेशनात येणार आहे. असं शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे (Shiv Sena leader Nilam Gorhe) यांनी सांगितलं. कोरोना विधवा या विषयावर त्या म्हणाल्या, कोरोनात विधवा झालेल्या महिलांच्या सर्वेक्षणाला गती देण्यासाठी त्या टीमला स्टाफ देण्याची मागणी केली आहे. गडचिरोलीत कोरोना मृत्यृ झालेल्या पतीच्या विधवा पत्नीला केशवपन करायला सांगितलं होतं. कोरोना लसीकरणाच्या वेळेस नागपूरच्या नागरिकांना पाणी आणि सावलाची सुविधा व्हावी, यासाठी प्रयत्न केल्याचं त्या म्हणाल्या.
विदर्भाचे प्रश्नही येणार चर्चेला
विदर्भ असो की संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष नागपूर अधिवेशनावर असते. ज्वलंत प्रश्न सोडवण्याचं केंद्र म्हणून आम्ही नागपूर अधिवेशनाकडे बघतो. कोविड, ओमिक्रॉनमुळे नाईलाजाने अधिवेशन मुंबईत घेण्यात आलंय. पण या अधिवेशनातंही विदर्भाचे प्रश्न चर्चेला येणार आहेत. मुंबईत यापूर्वी झालेले अधिवेशन कमी कालावधीचे झाले. पुढच्या काळात परिस्थिती बदलल्यावर नियोजित बैठका आणि कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी दिलीय.
शाळेची दंडेलशाही योग्य नाही
पुणे पालक मारहाण प्रकरणी निलम गोऱ्हे म्हणाल्या, मुलांना मोफत शिक्षण देऊ नका. पण काही सवलती द्या. पुण्यात पालकांना मारहाणीचा प्रकार बघीतला. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी अशाप्रकारची दंडेलशाही योग्य नाही. पालकांनी एका मुलाची फी माफ करा असे वाद घालायला लागले तर सर्वच पालक वाद घालतील. पुण्यात काही शाळा अवैध आहे. त्याची नोंदणी नाही, असेही त्या म्हणाल्या. पालकांची दिशाभूल केली जाते. अधिवेशनात शाळांच्या प्रश्नाबाबत शिक्षणमंत्र्यांना पुढच्या दोन तीन दिवसांत बैठक घ्यायला लावणार आहे, असेही त्यांनी सांगितलं. पालकांनी संपूर्ण फी माफीची अपेक्षा करू नये. शाळा बंद व्हायला नको. फी अभावी विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबायला नको.