“अदित्य ठाकरे यांच जितकं वय, तितकी एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द”; त्या आरोपांना एकाच वाक्यात उत्तर..

न्यायालयाच्या निकाला नंतर जो काही निर्णय येईल तो सर्वांना मान्यच करावा लागणार आहे. आमच्या बाजूने निकाल आला तर वेल अँड गुड मात्र नाही आला तर मात्र न्यायालयाचा निर्णय मान्यच करावा लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अदित्य ठाकरे यांच जितकं वय, तितकी एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द; त्या आरोपांना एकाच वाक्यात उत्तर..
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 6:53 PM

नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबद्दल मोठा गौप्यस्फोट केला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, बंडखोर करण्याआधी एकनाथ शिंदे मातोश्रीवर आले होते, आणि त्यावेळी ते रडले होते, असा गंभीर आरोप त्यांनी केल्यानंतर ठाकरे विरुद्ध शिवसेना असे आता वाकयुद्ध पेटले आहे. त्यावरूनच आता ठाकरे गटावर शिवसेना आणि त्यांच्या आमदारांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संतोष बांगर आणि आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटावर त्यांनी निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागल्यानंतर आता त्यांना बऱ्याच गोष्टी कळत असल्याचे म्हणते त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.

ot

मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्यावर ठाकरे गट फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी टीक करत असतो. राजकीय कहाण्या रचून आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम आदित्य ठाकरे यांच्याकडून केले जात आहे. मात्र ज्या एकनाथ शिंदे याच्यावर आदित्य ठाकरे टीका करत आहे.

त्या आदित्य ठाकरे यांचे वय जितकं आहे, तितकी एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांवर टीका केली जात असली तरी त्या त्यांच्या आरोपामध्ये कोणतेही सत्य वाटत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

अपात्र आमदारांविषयी बोलताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, सुप्रिम कोर्टात निकाल कसा येईल हे माहिती नाही. मात्र आमची अंतिम सुनावणी झालेली आहे.

न्यायालयाच्या निकाला नंतर जो काही निर्णय येईल तो सर्वांना मान्यच करावा लागणार आहे. आमच्या बाजूने निकाल आला तर वेल अँड गुड मात्र नाही आला तर मात्र न्यायालयाचा निर्णय मान्यच करावा लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.