नागपूर: शिवसेना नेते संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करेल. संबंधित महिलेल्या आरोपांनंतर संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषद घेऊन आपली बाजू मांडली होती. यावेळी त्यांनी माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी कोणीतरी जाणुनबुजून मला या सगळ्यामध्ये गोवत असल्याचे म्हटले होते. एवढेच नव्हे तर संजय राठोड यांनी स्वत:हून याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.
संजय राठोड यांनी आपल्याला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून धमक्या आल्याचे म्हटले होते. त्यामुळे याप्रकरणाच्या चौकशीसाठी आता सायबर सेलचीही मदत घेतली जाणार आहे. महिलेनं केलेली तक्रार आणि संजय राठोड यांना मोबाईलवर आलेल्या एसएमएसची चौकशी होईल. त्यामुळे आता या चौकशीतून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मी एका संस्थेचा प्रतिनिधी होतो. शिवपुरी येथे या संस्थेच्या माध्यमातून आश्रम शाळा सुरू आहे. या शाळेतील तीन कर्मचारी सातत्याने गैरहरज राहिल्याने त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. हे प्रकरण हायकोर्टात गेलं. त्यानंतर संस्थेने मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरती पदे भरण्याची परवानगी घेऊन तात्पुरती पदे भरली. तशी जाहिरात दिली होती. एका शिक्षकाचं प्रकरण झालं. त्याने सहायक आयुक्तांकडे राजीनामा दिला. 13 एप्रिल 2017 मध्ये राजीनामा दिला. नंतर हे प्रकरण नव्हतं. पण नंतर त्या शिक्षकाचे नातेवाईक आले आणि नोकरीवर घेण्याची विनंती होते. पण कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्याने तुम्हाला नोकरीवर घेऊ शकत नसल्याचं त्यांना मी सांगितलं. हवं तर कोर्टात जा असं त्यांना सांगितलं, असं ते म्हणाले.
मीही त्या संस्थेचा राजीनामा दिला आहे. याप्रकरणी शाळेतील एका शिक्षकाला काही मेसेज आले. त्याचं नावही संजय आहे. आधी संजय नावाच्या माझ्या या सहकाऱ्याला मॅसेज यायचे, नंतर मला पण मॅसेज यायला लागले’ म्हणून आम्ही तक्रार केली होती. मध्यंतरी माझं एक प्रकरण झालं. त्याचा आधार घेऊन काही केल्यास नोकरी मिळेल असा सल्ला त्या लोकांना कुणी दिला असेल. त्यामुळे मलाही मेसेज येणं सुरू केलं. त्यामुळे मीही 28 जुलै 2021 रोजी वडगाव पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली, असं त्यांनी सांगितलं. माझ्यावर करण्यात आलेले आरोप नैराश्यातून, मानसिकतेतून करण्यात आली आहे. संस्थेत कामाला लागलो पाहिजे या मानसिकततेतून हा आरोप झाला असेल, असे संजय राठोड यांनी सांगितले होते.
संबंधित बातम्या:
संजय राठोडांच्या अडचणीत वाढ, शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोलिसात तक्रार
विवाहबाह्य संबंध, बायकोला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप असलेले गजानन काळे नेमके कोण आहेत?