Nagpur Congress | गतिमंद आयुष चंद्रपुरातून वडिलांपासून दुरावला, अकोला रेल्वेस्थानकावर दोन दिवसांनंतर सापडला, महिला काँग्रेस, रेल्वे पोलिसांची मदत

सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. ज्या नंबरवरून आयुषनं फोन केला होता तो नंबर ट्रॅक करण्यात आला. आयुषचे आई-वडील नागपुरात आले. आयुषनं केलेल्या फोनचे लोकेशन सेलू (वर्धा) दाखवत होते. त्यानंतर वर्धा महिला काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला. तोपर्यंत गीतांजली एक्सप्रेसनं वर्धा लोकेशन क्रॉस केला होता. अकोला येथील महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला.

Nagpur Congress | गतिमंद आयुष चंद्रपुरातून वडिलांपासून दुरावला, अकोला रेल्वेस्थानकावर दोन दिवसांनंतर सापडला, महिला काँग्रेस, रेल्वे पोलिसांची मदत
अकोला रेल्वेस्थानकावर आयुष दोन दिवसांनंतर सापडला
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 2:43 PM

नागपूर : आयुष वय वर्षे वीस. वडिलांसोबत चंद्रपूरला (Chandrapur) आला. सहा जूनला सायंकाळी गाडीतून उतरला. त्यानंतर तो वडिलांना दिसलाच नाही. आयुष (Ayush Padgilwar) तो थोडासा गतिमंद आहे. त्यामुळं वडिलांना भीती वाटली. मुलाजवळ फोन नव्हता. आजूबाजूला शोध घेतला. पण, आयुष काही सापडला नाही. गतिमंद असल्यानं तो कुठं गेला असेल, याची चिंता त्याच्या वडिलांना लागली. संध्याकाळपर्यंत फिरल्यानंतर आयुषच्या वडिलांनी अखेर चंद्रपूर पोलिसांत तक्रार नोंदविली. गडचिरोली महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली पडगीलवार यांचा आयुष हा मुलगा. दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेदहा वाजता आयुषनं त्याच्या आईला फोन केला. तेव्हा आयुष नागपूर रेल्वेस्टेशनवर असल्याचं कळलं. तसा आवाज येत होता. दुसऱ्याच्या फोनवरून फोन आल्यानं फार काही बोलता आलं नाही. परत कॉल केल्यानंतर उचलला गेला नाही. ही माहिती काँग्रेसच्या नागपूर महिला शहराध्यक्ष नॅश नुसरत अली (Nash Nusrat Ali) यांना मिळाली. त्यांनी सीताबर्डी पोलीस स्टेशन गाठलं. सीताबर्डी पोलिसांनी नागपूर रेल्वे पोलिसांची मदत घेतली.

पाहा व्हिडीओ

अशी केली ट्रॅकिंग

सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. ज्या नंबरवरून आयुषनं फोन केला होता तो नंबर ट्रॅक करण्यात आला. आयुषचे आई-वडील नागपुरात आले. आयुषनं केलेल्या फोनचे लोकेशन सेलू (वर्धा) दाखवत होते. त्यानंतर वर्धा महिला काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला. तोपर्यंत गीतांजली एक्सप्रेसनं वर्धा लोकेशन क्रॉस केला होता. अकोला येथील महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला. नागपूर रेल्वे पोलिसांनी अकोला रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. अकोल्यात आयुषला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आयुषचे आईवडील त्याला घेण्यासाठी काल रात्री उशिरापर्यंत अकोल्याला पोहचले. आयुषला दोन दिवसानंतर पाहिल्यावर त्याच्या पालकांच्या डोळ्यात पाणी आले. दोन दिवसांनंतर आयुष त्यांना दिसला. अखेर आयुषला घेऊन त्याचे पालक आता गडचिरोलीला रवाना झाले.

हे सुद्धा वाचा

यांनी केली शोधासाठी मदत

नागपूर अध्यक्षा नॅश नुसरत अली तात्काळ मदतीला धावल्या. महाराष्ट्र काँग्रेसच्या महिला अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी ही सारी यंत्रणा हलविली. त्या म्हणाल्या, मला माहिती मिळताच मी संबंधित पोलीस व रेल्वे प्रशासनाशी संवाद साधला. आयुष गीतांजली एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे अकोला येथून दुपारी चार वाजता गीतांजली एक्सप्रेसमधून आयुषला ताब्यात घेण्यात आले. आयुषच्या शोधासाठी अकोल्याच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा काळे, नागपूर महिला शहर काँग्रेसच्या अध्यक्षा नॅश नुसरत अली, रेल्वे पोलिसांचे एसपी राजकुमार जी, रेल्वे पोलीस नागपूरच्या पीआय मनीषा काशीद, कॉन्स्टेबल भूपेश, गीतांजली एक्स्प्रेसचे टीटी पाटील या सर्वांनी अथक परिश्रम घेतले. त्यामुळं दोन दिवसांत आयुष त्याला पालकांना भेटला. तो मुंबईला गेला असता तर कदाचित चित्र काहीस वेगळं असतं…

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.