Nagpur Crime | एफआयआर दाखल करणार नाही म्हणून मागितली लाच; रामटेकचा वनपाल कसा अडकला एसीबीच्या जाळ्यात?

तुझ्याविरोधात एफआयआर दाखल करणार नाही. त्यासाठी तुला एक लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणणाऱ्या वनपालाची एकाने तक्रार केली. एसीबीने सापळा रचून हिवराबाजार येथे वनपालाला 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली.

Nagpur Crime | एफआयआर दाखल करणार नाही म्हणून मागितली लाच; रामटेकचा वनपाल कसा अडकला एसीबीच्या जाळ्यात?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 11:01 AM

नागपूर : रामटेक (Ramtek) तालुक्यातील हिवराबाजार येथे वनपाल निशाद अली याची नियुक्ती आहे. सहायक वनरक्षक संदीप गिरी यांची रामटेक कार्यालयात नियुक्ती आहे. तक्रारकर्त्यावर काही दिवसांपूर्वी वन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. त्या प्रकरणात प्रथम सूचना अहवाल (एफआयआर) आणि दोषारोपपत्र दाखल केले जाऊ नये, यासाठी या दोघांनी त्याला एक लाख रुपयांच्या लाचेची (bribe) मागणी केली होती. प्राप्त तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने शुक्रवारी हिवराबाजार येथील वनविभागाच्या कार्यालय परिसरात सापळा रचला. निशाद अली याने पहिल्या हप्त्याचे 50 हजार रुपये घेताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात सहायक वनसंरक्षक संदीप गिरी यांचे नाव समोर आले. त्याच्यावरही शुक्रवारी गुन्हा नोंदविण्यात आला.

तक्रारकर्ताही गुन्हेगार असल्याची माहिती

तक्रारकर्ता हा अवैध वृक्षतोड आणि रेतीची चोरी करत असल्याची माहिती आहे. त्यामुळं तक्रारकर्त्याचे वनअधिकाऱ्याचे सुमधूर संबंध होते. पण, वनअधिकाऱ्याची डिमांड वाढत गेल्याने तो अडचणीत आला. देऊन देऊन किती पैसे द्यायचे, असे त्याला वाटले. मिळकतीपेक्षा अधिकाऱ्यांचेच पोट भरायचे का, असं म्हणून त्यानं एसीबीकडे तक्रार केली. त्यामुळे या प्रकरणामुळे तोही आता गोत्यात येऊ शकतो. चोर चोर मौसेरे भाई, असा हा प्रचार सुरू होता.

पार्किंगच्या वादातून दुकान मालकावर ताणली बंदूक

दुसऱ्या एका घटनेत, जरीपटकाच्या तथागत चौकात एक हार्डवेअरचं दुकान आहे. या दुकानाच्या समोर एकाने गाडी आणून उभी केली. दुकानदाराने त्याला गाडी पार्क करण्यास मनाई केली म्हणून दुकानदार आणि गाडी मालक यांच्यात वाद झाला. वाद इतका वाढला की कार चालकाने आपल्या जवळची बंदूक दुकानदारावर ताणली आणि धमकी दिली. हा सगळा प्रकार पाहून आजूबाजूचे दुकानदार आणि ग्राहक तिथे पोहचले. पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी कार मालक याच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती जरीपटक्याचे पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनी दिली.

Nagpur Corona | नागपुरात कोरोनाचे तीन बळी, चिंता वाढली; बाधितांमध्ये पोलिसांची संख्या किती?

electric shock | पतंगाच्या मागे धावला नि होत्याचे नव्हते झाले; नागपुरात विजेच्या धक्क्याने गमावला जीव! 

Sunil Kedar | त्वरा करा, शेतकऱ्यांसाठी पन्नास टक्के अनुदान; पशुसंवर्धन विभागाच्या योजना जाणून घ्या…

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.