Nagpur Tiger महाराजबागेतील प्राण्यांची विशेष काळजी, थंडीपासून बचावासाठी हिटरची ऊब
वाघ, बिबट्या आणि अस्वलाच्या पिंजऱ्याजवळ हिटर लावण्यात आले आहे. दरवर्षी थंडीत प्राण्यांना ऊब मिळावी, यासाठी अशाप्रकारची व्यवस्था करण्यात येत असल्याचं महाराजबागेचे क्युरेटर डॉ. बावीस्कर यांनी सांगितलं.
नागपूर : हवेत गारठा वाढल्यामुळं महाराजबागेतील प्राण्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. तिथल्या प्राण्यांना थंडीचा त्रास जाणवू नये, यासाठी हिटर लावण्यात आले आहेत. पशुपक्ष्यांना नैसर्गिक ऊब मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
वाघ, बिबट्या, अस्वलीसाठी हिटर
विदर्भातील हवेत गारठा वाढला आहे. ढगाळ वातावरण व थंड वारा वाहत असल्यानं थंडी वाटते. याचा परिणाम मानवासोबतच प्राण्यांवरही पडतो. त्यामुळं महाराजबाग येथील बिबट्या व वाघ यासारख्या संवेदनशील प्राण्याची विशेष काळजी घेतली जात आहे. थंडीत मानसांना जशी कोवळ्या उन्हेची गरज असते, तशीच गरज आता प्राण्यांनाही आहे. पण, वाघ, बिबट, अस्वल हे महाराजबागेत असल्यानं ते उन्हात फारसे फिरू शकत नाहीत. त्यामुळं त्यांच्याजवळ हिटरची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराजबागेतील व्यवस्थापनानं ही व्यवस्था केली आहे.
पशुपक्ष्यांचीही काळजी
थंडीची सर्वाधिक झळ पक्ष्यांना पोहचते. त्यांना रात्री थंड हवेची झळ पोहचू नये, म्हणून ऊब देणाऱ्या पोत्यांनी झाकले जात आहे. प्राण्यांना रात्री जमिनीचा गारवा जाणवू नये, यासाठी पालापोचोळ्याचे बिडिंग केले जात आहे. जेणेकरून रात्री गारठा जाणवल्यास प्राणी त्यांची नैसर्गिक व्यवस्था करू शकतील. वाघ, बिबट्या आणि अस्वलाच्या पिंजऱ्याजवळ हिटर लावण्यात आले आहे. दरवर्षी थंडीत प्राण्यांना ऊब मिळावी, यासाठी अशाप्रकारची व्यवस्था करण्यात येत असल्याचं महाराजबागेचे क्युरेटर डॉ. बावीस्कर यांनी सांगितलं.
मदतीचे आवाहन
महाराजबागेत पर्यटक येत असतात. काही पर्यटक हे वन्यजीव प्रेमी असतात. त्यांना प्राण्यांची विशेष काळजी असते. अशा व्यक्तींनी शक्य झाल्यास प्राण्यांसाठी शक्य ती मदत करावी, असं आवाहन क्युरेटर बाविस्कर यांनी केलंय. शहरात आज कमीत-कमी तापमान १५ डिग्री सेल्सिअस होता. तर जास्तीत जास्त तापमान ३० डिग्री सेल्सिअस होते. पुढच्या आठवड्यातही १४ ते १७ डिग्री सेल्सिअसपर्यंत कमीत-कमी तापमान राहण्याची शक्यता आहे. जास्तीत-जास्त तापमान २९-३० च्या जवळपास असेल.