Nagpur RSS | श्रीलंकन उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांची संघ मुख्यालयाला भेट, डॉ. मोहन भागवतांशी काय हितगूज?
श्रीलंकन उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली. सरसंघचालक डॅा. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) यांच्याशी हिचगूज केले. सरसंघचालकांशी विविध विषयांवर केली चर्चा केली. आद्य सरसंघचालक डॅा. हेडगेवार यांच्या निवासस्थानाला मोरागोडा यांनी भेट दिली.
नागपूर : भारतातील श्रीलंकन दुतावासाचे उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा (High Commissioner of Sri Lankan Embassy Milinda Moragoda) हे गुरुवारी सकाळी नागपुरात आले. मोरागोडा यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) यांची भेट घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानाला भेट दिली. त्यानंतर मोरागोडा हे महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) मुख्यालयात गेले. त्याठिकाणी संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली.
रेशीमबागेतील हेडगेवार स्मृतीस्थळालाही दिली भेट
डॉ. मोहन भागवत यांनी मोरागोडा यांचे स्वागत केले. मोरागोडा यांनी भागवत यांच्याशी चर्चा केली. विविध सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेनंतर मोरागोडा यांनी रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली. डॉ. केशव हेडगेवार तसेच गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. मोरागोडा यांच्याशी भागवत यांनी सविस्तर चर्चा केली. मात्र, चर्चेचा विषय कळू शकला नाही. ही सदिच्छा भेट असल्याची सांगितलं जात आहे. श्रीलंका आणि भारत यांचे संबंध मजबूत ठेवण्यासाठी या भेटीचा उपयोग होऊ शकतो.