Video Nagpur Star bus fire : नागपुरातील संविधान चौकात स्टार बसला भीषण आग; बसमध्ये होते 45 प्रवासी

संविधान चौकात स्टार बस पेटताच वाहकानं हुशारी केली. पटकन प्रवाशांना खाली उतरविण्यात आलं. एक वृद्ध महिला फसली होती. वाहकानं प्रसंगावधान साधून तिला बाहेर काढलं.

Video Nagpur Star bus fire : नागपुरातील संविधान चौकात स्टार बसला भीषण आग; बसमध्ये होते 45 प्रवासी
नागपुरातील संविधान चौकात स्टार बसला भीषण आगImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 11:33 AM

नागपूर : नागपुरातील संविधान चौकात आज अचानक स्टार बसला आग (fire broke out) लागली. यावेळी बसमध्ये 45 प्रवासी (45 passengers) होते. बसमधून धूर निघत असल्याचं लक्षात येताच चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखत प्रवाश्यांना बाहेर (passengers survived) काढलं. वाहकाने एका वृद्ध महिलेला उचलून बाहेर काढलं. त्यामुळं जीवितहानी झाली नाही. बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. यंदाच्या उन्हाळ्यात स्टार बसला आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. तापमान वाढल्यानं आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसंच शहरातील अनेक स्टार बसचं मेंटेनन्स होत नसल्यानं सुद्धा आग लागण्याच्या घटना घडताहेत. गौरव कांबळे या वाहकानं यानिमित्त टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.

पाहा व्हिडीओ

यंदाच्या उन्हाळ्यातील तिसरी स्टार बस पेटली

नागपूर स्टार बसची हालत खराब आहे. मध्यंतरी कर्मचाऱ्यांनी वेळेवर पगार मिळावा, यासाठी आंदोलन केलं होतं. कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नव्हते. अशीची काहीशी अवस्था मेंटनन्सच्या बाबतीत आहे. स्टार बसचे व्यवस्थापन योग्य पद्धतीनं होत नाही. त्यामुळं आगीच्या घटना घडतात. यंदा उन्हाळ्यात स्टार बस पेटण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी मेडिकल चौकात स्टार बस पेटली होती. तापमान वाढल्यामुळं या गाड्या पेटतात. पण, त्या योग्य पद्धतीनं तंदुरुस्त असत्या तर पेटल्या नसत्या असं चालक चांगतात. गाडी चांगली असेल तर ती सहसा पेट घेत नाही. पण, गेल्या काही दिवसांपासून स्टार बसची योग्य पद्धतीनं दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळं खटारा गाड्या रस्त्यावर धावत आहेत. या अतिशय धोकादायक आहेत.

वृद्ध महिलेला वाहकानं बाहेर काढलं

संविधान चौकात स्टार बस पेटताच वाहकानं हुशारी केली. पटकन प्रवाशांना खाली उतरविण्यात आलं. एक वृद्ध महिला फसली होती. वाहकानं प्रसंगावधान साधून तिला बाहेर काढलं. अग्निशमन विभागाचं पथक घटनास्थळी पोहचलं. तोपर्यतं गाडी जळून खाक झाली होती. अग्निशमन विभाग तत्पर आहे. त्यांच्याकडं कर्मचाऱ्यांची कमी असल्यानं नुकतीच भरती प्रक्रिया राबविण्यात आली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.